पिपरटोला (तानुटोला) येथे मनरेगा कामाचे भूमिपूजन.

0
15

निंबा (गोरेगाव):- ग्राम पंचायत पिपरटोला (तानुटोला), गोवारीटोला येथे मनरेगा अंतर्गत रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन दिनांक 02 जून रोज शुक्रवारला करण्यात आले.
या रस्ता खडीकरण कामाचे भूमिपूजन मनोज बोपचे सभापती पंचायत समिती गोरेगाव यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सशेंद्र भगत जि. प. सदस्य निंबा हे होते, प्रमुख उपस्थित रमेश पंधरे पंचायत समिती सदस्य निंबा, वैशाली कुसराम सरपंच ग्रा.प. पिफरटोला (तानु.), ओंकार कटरे उपसरपंच ग्रा.प. पिपरटोला (तानु.), विलास सूर्यवंशी ग्राम विकास अधिकारी, रेखचंद देशमुख रोजगार सेवक, सर्व ग्राम पंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक ओंकार बिसेन, चंद्रसेन रहांगडाले, सुरेंद्र रहांगडाले व इतर गावकरी उपस्थित होते.यात गावातील मजुरांना काम मिळाल्याने प्रत्येक हाताला काम ही संकल्पना प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे.