
गोंंदिया,दि.25-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे उपविभाग असलेल्या सालेकसा येथील कार्यालयाचे छत कोसळल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.जिर्णवस्थेत असलेल्या या उपविभागीय कार्यालयाच्या दुरुस्तीकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीची मागणी करुनही कार्यालयाची दुरुस्ती करण्यात आली नाही.परिणामी गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या जोरदारपावसामुळे आधीच जिर्ण असलेल्या या कार्यालयाचेे वर्हांडाचे पीओपीसह छत कोसळले.प्लाय लावून डागडुजी करण्यात आलेले छत इमारतीला लागलेल्या लाकडी राॅप्टरसह कोसळले.यावेळी कर्मचारी हे आपल्या कार्यालयातील टेबलावरच असल्याने जिवितहानी झाली नाही.मात्र जिवमुठीत घेऊनच येथील अधिकारी कर्मचारी काम करीत असून कधी मोठी घटना होईल याचा अंदाज नाही.फारजुनी व मोडकळीस असलेली ही इमारत गेल्या 8-ॊ0 वर्षापासून जिर्णावस्थेत आहे.मात्र इमारतीच्या दुरुस्तीकडे पाहिजे तसे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.





