मालकनपुर येथे सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे उटघाट्न

0
12

अर्जुनी मोर. :–कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक; आणि मानसिकदृष्ट्या व्यक्तीला परिपक्व होण्यास वाचन मदत करते. प्रत्येक पुस्तक आपल्याला शिकण्यासाठी एक नवीन संधी देत असते. पुस्तके वाचल्याने आपले ज्ञान वाढते.याच उद्दात हेतूने तालुक्यातील मालकनपुर येथे शनिवार (ता.२६) रोजी रोजी सार्वजनिक वाचनालयाचे उटघाट्न करण्यात आले.नव्याने सुरू केलेल्या सार्वजनिक वाचनालयाला सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय असे नाव देण्यात आले वाचनालयाचे उटघाट्न तं.मु.अध्यक्ष चंदू शहारे माहूरकुडा यांनी केले,लक्ष्मीकांत नाकाडे सरपंच माहुरकुडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष नाकाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,पूर्वीच्या तत्त्ववेत्त्यांपासून ते खगोलशास्त्रज्ञांपर्यंत, प्रत्येकजण त्यांच्या ज्ञानाच्या प्रगतीसाठी पुस्तकांवर अवलंबून होते.वाचन म्हणजे आपल्या जीवनाला उन्नत करणारी गोष्ट ज्यामुळे आपली बुद्धिमत्ता अधिक वाढते. तसेच माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा सर्वात मोठा वाटा असतो. यावेळी कार्यक्रमाला सौ. हेमलता नेवारे अंगणवाडी सेविका, संघदीप भैसारे, नरेश खंडाईत,चैनशिंग सापा सदस्य माहुकुडा,स्मिता पाटणकर सदस्य,गीता पाटणकर पो.पा.मालनपुर,दिलीप वाघाडे ,दीपक सापा वनविभाग महागांव,राधेलाल वाळवे अध्यक्ष वनसमिती,पुनाराम ठाकरे,भूमिकांता खंडाईत,सरिता नंदागवळी,अलिखा सापा, यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार पडले.यावेळी वाचनालयाचे सदस्य श्याम राऊत,मनिष पाटणकर, भूपेश राऊत,सतीश वाळवे तसेच गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते उपस्थित होते.