अर्जुनी मोर- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमा’चे आयोजन अकरावी व बारावीतील च्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून तालुका दिवानी न्यायाधीश श्रीमती एन. व्ही. साहू, अग्याराम मदनगोपाल शिक्षण संस्थेचे सचिव सर्वेश भुतडा, सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे. डी. पठाण, सहाय्यक शासकीय अधिवक्ता श्रीमती सारिका काटेखाये, पोलीस उपनिरीक्षक गुट्टे, तालुका अधिवक्ता संघटना अध्यक्ष तेजस कापगते, ऍड. भाजीपाले, ॲड. अवचटे, ऍड. रामटेके, ऍड. शहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
श्रीमती साहू यांनी पोक्सो कायद्याविषयी माहिती दिली. यासोबतच उपस्थित अधिवक्ता यांनी रॅगिंग, मुलींची छेड काढणे, वाहतूक नियम, सायबर क्राईम, समाज माध्यमांचा वापर करताना घ्यावयाची काळजी, अल्पवयीन करिता असलेला कायदा, अनैतिक बाबी ओळखणे याविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक यांनी विविध हॅकर्स व ऑनलाइन गंडा देणारे कशा प्रकारे फसवणूक करतात तसेच यातून मानसिक शारीरिक व आर्थिक पिळवणूक कशी होते याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य जे. डी. पठाण यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक कायद्यांची माहिती असावी व कुठली अडचण आल्यास आपल्या शिक्षकांशी व प्रसंगी प्राचार्यांशी संपर्क साधून आपली अडचण सोडवून घ्यावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक इंद्रनील काशीवार यांनी केले.