चंद्रपूर : सावली परिक्षेत्रातील मुल-राजोली-सिंदेवाही मार्गावर झालेल्या एका अपघातात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. माहिती मिळताच वन पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. चारचाकी वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्राणी उपचार केंद्र, चंद्रपूर येथे आणण्यात आला आहे.