रानटी हत्तीच्या हल्ल्यात वन विभागाचा कर्मचारी ठार….

0
15
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गडचिरोली 16 सप्टेंबर :- वडसा वन विभागात येत असलेल्या आरमोरी वनपरिक्षेत्रात पळसगाव वन कक्षात हत्तीच्या हल्ल्यात वन विभागाचा वाहन चालक जागीच ठार झाल्याची घटना साडेचार वाजताच्या सुमारास घडली आहे. मृतक वाहन चालकाचे नाव सुधाकर बापुराव आत्राम (५२) आहे.

आरमोरी वनपरिक्षेत्रात पळसगाव वन कक्षात रानटी हत्तीनी धुमाकूळ घातला आहे मागील काही दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या पिकातील तोंडात आलेला घास हत्तीच्या हैदोसामुळे पडला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.अशातच पळसगाव वन कक्षात रानटी हत्ती आल्याची घटना गावकऱ्यांनी वन विभागाला कळविले घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गावातील आणि वन कर्मचारी रानटी हत्तींना पळवून लावण्याचा प्रयत्न करीत असताना बिथरलेल्या हत्तींनी सैरावैरा पडू लागले. त्यावेळी शेकडो स्थानिक नागरिक कर्मचारीही हत्तींना परतून लावत असताना वाहन चालक मृतक गाडी बाजूला ठेवून समोरून पाहत असताना अचानक जंगलातून त्यांच्या दिशेने रानटी हत्ती समोर आला असता जवळील नागरिक पडून जाण्यात यशस्वी झाले मात्र त्या ठिकाणी वाहन चालक सुधाकर आत्राम खाली पडल्याने हत्तींनी वाहन चालकाचा फुटबॉलच केला वाटेल त्या दिशेने आदळ आपट करून लचके तोडले त्यावेळी उपस्थित असलेले कर्मचारी नागरिकांनी जोरजोराने आरडाओरड केल्याने रानटी हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेले.

ओडिसा राज्यातून आलेल्या हत्तींनी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. मागील दोन महिन्यांआधी एका वृद्धाचा रानटी हत्तीमुळेच जीव गमवावा लागला होता.तर काही जखमी झाले होतें त्यामुळे स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेवून जगावे लागत आहे. आधीच वाघाने कित्येकाचे जीव घेतले असल्याने संकटात सापडले होते. अशातच रानटी हत्तीचे नागरिकावर होणारे हल्ले, उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे वन विभागाने वेळीच लक्ष घालून रानटी हत्तींना पळवून लावण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्याला प्रशासन नक्कीच मदत करेल मात्र सामान्य माणसाला या जंगली रानटी हत्ती वाघामुळे कसे जगायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

रानटी हत्तीने वन कर्मचाऱ्याचा जीव घेतल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली अनेक नागरिक घटनेचे साक्षीदार झाले आहेत. या घटनेची गांभीर्य ओळखून वनाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केले असून घटनेचा पंचनामा करून मृतदेह हस्तगत करीत शवच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वडसा येते नेण्यात आले आहे. झालेला घटनेचा अधिक तपास मुख्य वन संरक्षक रमेश कुमार यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक सालविठ्ठल सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण आदी वनाधिकारी, कर्मचारी करीत आहे.