व्यवसायिकांच्या हितासाठी व्यापारी संघटनेची स्थापना-जैन

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तालुका असोसिएशनचे गठन..
अर्जुनी मोरगाव-भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा छोट्या पासून मोठे व्यापारी आहेत.देशाचा आर्थिक स्तर उंचावण्यात व्यवसायिकांचा सिंहाचा वाटा आहे.हजारो प्रकारचे व्यवसाय करणारे व्यापारी गटातटात विभागले आहेत. व्यापाऱ्यांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे. व्यापाऱ्यांच्या विरोधात शासकीय निर्णय घेतले जातात.शासन स्तरावर व्यापाऱ्यांना त्रास दिला जातो. एखाद्या व्यापाऱ्यावर अन्याय होते आणि आपण दुरून बघत बसतो.यापुढे कुठल्याही व्यापारावर अन्याय होणार नाही यासाठी आपण एकजुटीने लढा दिला पाहिजे.व्यापारी व्यापाऱ्यांचे हित हे ध्येय,धोरण अंगीकारून गोंदिया जिल्हा व्यापारी संघाची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन गोंदिया जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय जैन यांनी केले.
ते स्थानिक शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित व्यापारी संघाच्या बैठकीत बोलत होते.व्यापारी संघाचे अध्यक्ष लुनकरण चीतलंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सचिव लक्ष्मण लधानी,महेंद्र खंडेलवाल,सुशील चित्रका,राजा इसारका,संपत सोनी,अरुण शुक्ला उपस्थित होते.
जैन पुढे म्हणाले, कोरोना महामारीत अनेक व्यापारी उध्वस्त झाले.मात्र त्याही परिस्थितीत स्थलांतरित मजुरांचे हाल बघून मानवतेचा वसा घेत व्यापारी त्यांच्या मदतीसाठी देवदूतासारखा समोर आला.जीवाची परवा न करता मजुरांना मदत केली. स्वहितासोबत राष्ट्र हित ही भावना व्यापारी जोपासतात. व्यापाऱ्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी या संघाची स्थापना झाली.जिल्ह्यातील 48 विविध व्यापारी संघ मिळून व्यापारी आता एकसंघ झाले. ही संघटना महाराष्ट्र चेंबर ऑफ कामर्स सोबत संलग्नित राहणार आहे.सर्व क्षेत्रातील लहान-मोठे व्यापारी एकत्र येऊन स्वहितासाठी हा लढा उभारण्याचे आवाहन केले. सभेत अर्जुनी मोरगाव तालुका असोसिएशनच्या कार्यकारणी चे गठन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय जयस्वाल,आभार राधेश्याम भेंडारकर यांनी केले.यावेळी उमाकांत ढेंगे,जयप्रकाश भैया, श्रीकांत घाटबांधे,दाणेश साखरे,रमेश माखीजा आणि तालुक्यातील व्यापारी उपस्थित होते.