कंपनीची कंत्राटी भरती बंद करुन आम्हाला न्याय दया

0
14

.बेरोजगार तरुणांची मागणी :राज्यपाल यांना दिले निवेदन

अर्जुनीमोरगाव :शासनाने काढलेल्या कंपनीच्या कंत्राटी भरतीला ग्रामीण भागातूनही विरोध होत आहे. सदर भरती बंद करावी सरकारची संविधानिक हक्काची आम्हाला नोकरी दया अशी मागणी निवेदनातून अर्जुनीमोरगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी केलेली आहे. सदर निवेदन राज्यपाल यांना तहसीलदार अर्जुनीमोरगाव यांच्या मार्फत करण्यात आली.

यावेळी तहसीलदार यांचे प्रतिनिधी वरिष्ठ लिपीक शैलेष रामटेके यांना निवेदन देताना आंबेडकरवादी साहित्याचे अभ्यासक प्रा. मुन्नाभाई नंदागवळी, डी टेक संगणक संस्था संचालक धम्मदीप मेश्राम, रोजगार सेवक लालचंद मारगाये, श्रीधर मेश्राम, हेमंत लाडे, प्रविण लांडगे, अभियंता सुनील मेश्राम, प्रशिक्षणार्थी प्रदीप प्रधान, पदवीधर शैलेष रामटेके आदी तरुण उपस्थित होते.

तरुणांनी निवेदनात नमूद कंपनीचा कंत्राटी नोकरी भरती शासन निर्णय रद्द करा, कंपनी भरती तातडीने बंद करा, शिक्षणाचा व नोकरीचा बाजारीकरण करु नका, कंत्राटदाराचे पोट भरु नका, शासनची तिजोरी खाली करु नका, नोकर भरतीची चालान कमी करा, आमदार खासदार व मंत्री यांची पेन्शन कमी करा, कंपनी भरती तातडीने बंद करुन बेरोजगारांना न्याय दयावा. अशा मागण्या करण्यात आल्या.राज्यापाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी गोंदिया यांना तहसीलदार यांच्या मार्फत पाठविण्यात आले.