आयुष्मान भव: मोहिम अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र रावणवाडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

0
6

रक्तदान शिबीरा दरम्यान जनजागृती करुन 32 लोकांनी केले रक्तदान
आरोग्यवर्धिनी केंद्र रावणवाडीचे तीन ही स्त्री वैद्यकीय अधिकारी यांनी स्वत: रक्तदान करुन 32 लोकांना केले प्रोत्साहीत

गोंदिया -समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी तसेच आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी आयुष्यमान भव मोहीम जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.या मोहिमे अंतर्गत आरोग्याशी संबधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला असुन जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत लोकोपयोगी आरोग्य कार्यक्रमे राबविण्यात येत आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्र रावणवाडी येथे दि.20 सप्टेंबर रोजी आयुष्मान भव: मोहिम अंतर्गत गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेद्प्रकाश चौरागडे यांच्या संकल्पनेतुन रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरा दरम्यान रावणवाडीचे सरपंच शिलाबाई वासनिक,गर्राचे सरपंच कुलदीप पटले,विवेक हरिणखेडे तसेच ईश्वर पटले,  वासनिक उपस्थित होते. 32 लोकानी रक्तदान करुन महादानाचे काम केलेले आहे. रक्तदान शिबीरा दरम्यान डॉ. पायल रहांगडाले, डॉ. नंदीनी रामटेककर ,डॉ. हीना शेख ह्या तीन ही स्त्री वैद्यकीय अधिकारी यांनी स्वत: रक्तदान करुन 32 लोकांना प्रोत्साहीत करुन आरोग्य विभागात नवा आदर्श निर्माण केला आहे.. त्यापाठोपाठ रक्तदान शिबीरादरम्यान आरोग्य कर्मचारी व रक्तदाते यांनी केलेली जनजागृती तसेच रांगोळी लक्षवेधी ठरली. जनजागृती साठी डॉ. नंदीनी रामटेककर यांनी महत्वपुर्ण भुमिका निभावली.
शिबिरा दरम्यान सर्व रक्तदाते यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. पायल रहांगडाले व डॉ. नंदीनी रामटेककर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. शिबिरादरम्यान रक्तदानाविषयीचे जनजागृती पोस्टर व रांगोळीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.
रक्तदान करुन आपण दुसर्याला जीवनदान देत असतो. युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करावे म्हणजे रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासणार नाही असे आवाहन डॉ. पायल रहांगडाले यांनी केले. डॉ. नंदीनी रामटेककर यानी रक्तदानाचे महत्वबाबतची माहीती दिली. त्यात वजन कमी करण्यास होते मदत​, तुमचे वजन जास्त वाढले असेल तर रक्तदान करण्याने यामध्ये फरक पडतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मिळतो फायदा, हृदयरोगाचा धोका होतो कमी, मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर त्यामुळे लोकांनी नियमित
रक्तदान करणे आवश्यक असल्याचे  सांगितले.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक चव्हाण व मसकरे , आरोग्य सहायिका भानारकर, सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. ठाकुर, डॉ. मौजे व सितेश वर्मा, स्टाफ मनिषा नंदेश्वर, परिचर नेवारे व सोर्ली, सफाईगार मुकेश, डाटा एन्ट्री ऑपरेटर सौरभ व पवन चिखलोंडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अमित मंडल, लँब टेक्निशियन राहुल , बाबु जतपेले ,वाहन चालक राजाभाऊ वाघाडे ,अंश कालीन स्त्री परिचर्कता सोर्ली मावशी व कता मावशी यांचे सहकार्य लाभले.