गोंदिया,दि.21ःः तालुक्यातील चुलोद येथे पहिल्यांदाच निःशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तुरकरसोनोग्राफी,एक्स-रे ,सी.टी. स्कॅन व एम.आर.आई. क्लिनिक (सोनोव्हीव)यांचे नवीन सामाजिक उपक्रम सोनोव्हिव आपका दवाखाना व परमात्मा एक सेवक परिसर चुलोदयांच्या संयुक्त विद्यमानाने, डॉ. घनश्याम तुरकरसीनियररेडियोलोजिस्ट(तुरकरसोनोग्राफी) व डॉ. पद्मिनी तुरकर(बालरोग तज्ञ ) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यानिःशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या निःशुल्क रोग निदान शिबिराचा १०० गरजू रुग्णानी लाभ घेतला.
शिबिरामध्ये नागरिकाचे मोफत ईसीजी,ब्लडशुगर व चेस्टएक्स-रे करण्यात आले. गरजू लाभार्थी व रुग्नांची रक्त तपासणी आणि विविध तपासणी डॉ: विनिता राजेश्वर कटरे (तुरकर) (पैथो माइक्रो विज़न लैब, सिविल लाइन गोंदिया) यांचा तर्फे करण्यात आली.सदरशिबिरामध्ये22संशयीत रुग्णाचेचेस्टएक्स-रे गोंदिया जिल्हा क्षयरोग केंद्र विभागामार्फत मोबाइल एक्स-रे वॅनद्यारा करण्यात आले .शिबिरामध्येमधुमेह (Diabetes), उच्चरक्तदाब (Hypertension) ,व इतर असंसर्गजन्यआजारावर उपचार व संपूर्ण मार्गदर्शन, क्षयरोग (TB) तपासणी, दाताचे रोग व त्यावर उपचार इत्यादि बाबीचा समावेश होता.
डॉ.राजेश फनिंद्र कटरे (MBBS ,MD -कम्यूनिटी.मेडिसिन, सोनोव्हिव आपका दवाखाना , सिविल लाइन गोंदिया),डॉ. शंकर बनोठे(दन्तचिकिस्तकPrime डेन्टलक्लिनिक गोंदिया), डॉ. दीपक विष्णु कटरेही समस्त चिकित्सक मंडळीनी या निःशुल्क रोग निदान शिबिरामध्येसेवा दिली.
शिबिरामध्ये मा. लतीसबिसेन (उपसरपंचग्रामपंचायतचुलोद) ह्यांनी तुरकरसोनोग्राफी,एक्स-रे ,सी.टी. स्कॅन व एम.आर.आई. क्लिनिक (सोनोव्हीव)यांचे नवीन सामाजिक उपक्रम सोनोव्हिव आपका दवाखानाद्वारा संचालितचैरिटेबलओपीडीबद्दल लोकांना माहिती दिली. डॉ.राजेश फनिंद्र कटरे ( Preventivemedicineexpert-सोनोव्हिव आपका दवाखाना)ह्यांनी Hypertension,मधुमेह,लकवा ,दमा, क्षय रोग (टीबी) वबदलत्या जीवनशैली मुळे होणार्या आजारबद्दल व त्यांचे प्रतिबंध कसे करता येईल हयाबद्दल माहीती दिली.
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाची जिल्हा पी.पी.एम. समन्वयक प्रज्ञा कांबळे ह्यांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितिन कापसे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हामध्ये क्षयरोग दुरिकरणासाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली व लोकांना टीबी मुक्त ग्रामपंचायतअभियानामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्यावर भर दिला .कार्यक्रमा यशस्वी करण्याकरिता थानसिंगठाकूर,लतीस बिसेन (उपसरपंच ग्रामपंचायत चुलोद),विजय भाऊ ठाकूर ( ग्रामपंचायत सदस्य ),विनोद बरईकर, सुनिलरकर,योगेश ठाकूर तसेचमस्त ग्रामवासी चुलोद यांचे विशेष सहकार्य लाभले.