तिरोडा तालुक्यात मेरी माटी मेरा देश कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

0
3

तिरोडा:-आजादी का अमृत महोत्सव निमित्त सप्टेंबर महिन्यात तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाची सुरुवात १६ सप्टेंबर २०२३ पासून सुरुवात झाली आहे या कार्यक्रमाला ग्रामीण भागात उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले हे प्रत्येक गावी जावून शौर्याचे प्रतिक स्तंभ व अमृतवाटिका तय्यार करण्यासाठी देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक गावाची माटीद्वारे दिल्ली येथे शौर्याचे प्रतिक स्तंभ व अमृतवाटिका तय्यार करण्यासाठी पाठविणार आहेत यामुळे देशभक्तीचे ज्योती तेवत राहील असे प्रतिपादन आमदार महोदयांनी व्यक्त केले या प्रसंगी पंचप्रण प्रतिज्ञा वाचन करण्यात येत असून याद्वारे ज्ञात व अज्ञात हुतात्म्याचे स्मरण केले जाते.प्रत्येक गावी भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात कारण्यात येत असते या अमृत कलश यात्रेमध्ये प्रामुख्याने यात्रा संयोजक मदन पटले, जी.प.सदस्य चत्रभूज बिसेन,पवन पटले, एड.माधुरी रहांगडाले, तुमेश्वरी बघेले,रजनी सोयाम, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, उपसभापती भूमेश्वर रहांगडाले प.स.सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार,भाजयुमो जिल्हाध्यक्ष ओम कटरे,भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, भाजयुमो तालुकाध्यक्ष रविंद्र वहिले, अमोल तीतीरमारे, शहरअध्यक्ष स्वानंद पारधी, प.स.सदस्य ज्योती शरणागत, प्रमिला भलाई, तेजराम चव्हाण, ज्योती टेंभेकर, चेतलाल भगत,कविता सोनेवाने,सुनंदा पटले, शहर महामंत्री दिगंबर ढोक, मक्रम लिल्हारे,प्रकाश सोनकावडे, नितीन पराते, संजय पारधी उपस्थित होते.