पंधरा वर्षापासून अबाधित राखली एक गाव एक गणपतीची संकल्पना

0
11

चुलोदवाशीयांचा स्तुत्य उपक्रम

सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

गोंदिया(ता.24) मागच्या पंधरा वर्षापासून गावात एक गाव एक गणपती उपक्रमाची संकल्पना राबवून एक आदर्श निर्माण करण्याची किमया तालुक्यातील चुलोद येथील नागरिकांनी साकार केली आहे.या उत्सवादरम्यान अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी गणेश उत्सवाला सामाजिक एकतेचे स्वरूप बहाल केले आहे.
वर्ष 2008 मध्ये या गावाला तंटामुक्त पुरस्कार मिळाले होते. तेंव्हा येथील तत्कालीन सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व गावकऱ्यांनी एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात सुरुवात केली. सदर उपक्रमाला खंड न देता आजही एक गाव एक गणपती उपक्रम गावकऱ्यांनी अबाधित सुरू ठेवली आहे. दरम्यान या गणेश उत्सवात अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून गणेश उत्सवाला सामजिक स्वरूप बहाल करून या गणेश मंडळांनी गावात सर्वांसमोर आदर्श निर्माण केले आहे.सदर एक गाव एक गणपती हा उपक्रम गावात निरंतर सुरु ठेवण्यासाठी येथील सरपंच मायाबाई बोरकर, पोलीस पाटील कविता भालाधरे, तंटामुक्त समतीचे अध्यक्ष प्रकाश बनकर,बाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र तुरकर, उपाध्यक्ष खोमेश रहांगडाले,कार्तिक जी, प्रवीण ठाकूर, जितू ठाकूर, सागर भगत,पंकज मेश्राम,मिथुन राणे,संजय बिसेन, गोल्डी दमाहे, अनिल ठाकूर, होमेंद्र ठाकूर,नितीश पारधी ,मिथिलेश कोकडे,अंकित मेश्राम,पिंटू ठाकूर,विजय हरीणखेडे, हार्दिक ठाकूर, विशाल हनवते,तथा गावकरी प्रयत्नशील आहेत.