इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचा कंत्राटदाराच्या मनमानी विरुद्ध अधीक्षक अभियंता कार्यालयसमोर 25 पासून साखळी उपोषण

0
7
भंडारा-:  गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्व कंत्राटी वीज कामगार कर्मचारी कंत्राटदारांच्या मनमानी  विरुद्ध इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने मुख्य मालक असलेल्या अधीक्षक अभियंता कार्यालय गोंदिया समोर दिनांक 25 सप्टेंबर 2023 पासून साखळी उपोषण आंदोलन सुरू करीत असल्याचे आवाहन परिमंडळाचे अध्यक्ष कॉम्रेड अशोक ठवकर, जिल्हाध्यक्ष कॉम्रेड राहुल रहांगडाले, जिल्हा सचिव कॉम्रेड सुरेश तितरे व काॅमरेड नामदेव चौधरी यांनी केले आहे.
तसेच वर्कर्स फेडरेशनचे झोनल अध्यक्ष कॉ.एस. जी.पेठे. सचिव कॉम्रेड विजय चौधरी, संयुक्त सचिव काॅ.विवेक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन असणार आहे.
     अनुभवी जुने कंत्राटी विज कामगारांना कामावर घ्या म्हणून मेसर्स उर्मिला इलेक्ट्रिकल्स व युनायटेड च्या कंत्राटदारांसोबत अधिक्षक अभियंता व वर्कर्स फेडरेशन या संघटनेचे प्रतिनिधींच्या बरोबर सकारात्मक चर्चा होऊन देखील व वारंवार पाठपुरावा करूनही कंत्राटदार कोणालाही जुमानत नाही.
    आणि म्हणून दोन्ही  कंञाटदाराच्या मग्रुरी व मनमानी विरुद्ध साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय वर्कर्स फेडरेशनने घेतला आहे.