गोंदिया : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नका, तसे झाले तर आदिवासी बांधवांवर अन्याय होईल, अशी भूमिका ऑल इंडिया आदिवासी पीपल फेडरेशनने २४ सप्टेंबरला राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांची भेट घेऊन चर्चेत भूमिका घेतली आहे.
धनगर बांधवांना अनुसूचित जमातीचे आरक्षण दिल्यास ताकद दाखवू असा इशारा निवेदनाद्वारे सत्ताधाऱ्यांना दिला आहे. धनगर हे आदिवासी नाहीत हे अनेक कसोट्यांवर सिद्ध झाले आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने सुध्दा अभ्यास करून धनगर आदिवासी नसल्याचा अहवाल दिला आहे. मात्र मतांच्या राजकारणासाठी राजकीय पक्ष आदिवासींच्या आरक्षणात नवा वाटेकरी तयार करत असल्याचा आरोप ऑल इंडिया आदिवासी पीपल फेडरेशनने केला आहे.
*धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण देण्यास आदिवासी संघटनांचा विरोध*
प्रफुल पटेल यांनी लवकरच मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सोबत आदिवासी समाज प्रतिनिधी मंडळ यांची बैठक सभा लावून देण्याचे आश्वासन दिले आहे .
धनगर समाजाला आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध नाही. धनगर बांधवांना इतर प्रवर्गाच आरक्षण देण्यात यावे मात्र अनुसुचित जमातीमध्ये जर धनगर समाजाचा समावेश करण्याची शिफारस सरकारने केली तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू, असा इशारा ऑल इंडिया आदिवासी पीपल फेडरेशनने दिला आहे.
ऑल इंडिया आदिवासी पीपल फेडरेशनचे करण टेकाम अध्यक्ष जिल्हा पीपल फेडरेशन, दुर्गाप्रसाद कोकोडे केंद्रीय सचिव , प्रमिला सिन्द्रामे , शीला उइके, नीलकंठ चिचाम, वीरेंद्र इडपाचे, श्यामराव उईके , राकेश सोयाम , ममता नागभीरे, रामकिसन पंधरे जितेंद्र तुमदाम, दामोदर वरठे, एच सी भोयर, अर्चना मडावी, अंबरलाल मडावी, राजेश खंडाते, राजकुमार टेकाम ,चंदनसिंग पुसाम, डी डी मडावी , सुरेश परतेती , संगीता पुसाम , घनश्याम तोडसाम , टेकसिंग पुसाम, राजा टेकाम , विवेक मरकाम , दिपकसिंग सयाम, शुभम कुंभरे, शेखर वाढवे, रामसिंग पंधरे, अंजीरा पुराम, पूजा पुराम, ललिता ताराम डिलेश्वरी मरस्कोल्हे, एन आर हरंदुले, मोहन राऊत, जे डी मानकर, वाय आर कलाम, आर सी औरासे, आर आर गेडाम, जितेंद्र तुमडाम, दूधराम धनबाते, सविता कोडपे सभापति ,राजकुमार गेडाम, ,दुधराम धनबाते, डी. डी. गवाड,राधिका सलामे,सरिता धनबाते,रंजना उइके, मोहन राऊत, एन.एस. हरुले,विक्की टेकाम, डिग्गीसिग मडावी,सुरेश परतेती,शुभम कुंभरे,सविता कोडापे ,दिनेश मडावी आदींनी. प्रफुल पटेल खासदार राज्यसभा यांच्यामार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे.