प्रत्येकाने स्वच्छतेकडून समृध्दीकडे वाटचाल करावी – अनिल पाटील

0
14

‘एक तारीख एक तास’ स्वच्छता उपक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्तपणे सहभाग
गोंदिया, दि.1 : वैयक्तिक स्वच्छतेसह सार्वजनिक स्वच्छता राखणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. आपण आपले घर स्वच्छ करतो तसेच आपले गांव पण स्वच्छ केले पाहिजे, त्यामुळे सर्वांचे आरोग्य निरोगी राहील. अर्थातच प्रत्येकाने स्वच्छतेकडून समृध्दीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले.
पंचायत समिती गोंदिया अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय कारंजा येथे ‘‘एक तारीख-एक तास’’ स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) दिनेश हरिणखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) संजय गणवीर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.महेंद्र गजभिये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार, नेहरु युवा केंद्राच्या युवा अधिकारी श्रुती डोंगरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.कांतीलाल पटले, पं.स.गटविकास अधिकारी आनंद इंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सोनटक्के, जि.प.चे माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये, कारंजा गावचे सरपंच लोकचंद कापसे, उपसरपंच विठ्ठलराव हरडे, ग्रामविकास अधिकारी राधेश्याम बहेकार यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
अनिल पाटील पुढे म्हणाले, स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत गोंदिया जिल्ह्यात ‘‘स्वच्छता ही सेवा’’ अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आपल्या सर्वांना ‘‘स्वच्छता ही सेवा’’ अभियान यशस्वी करायचे आहे. ‘‘एक तारीख-एक तास’’ या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे स्वरुप देण्याकरीता प्रत्येकाला आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. स्वच्छता आपल्या सर्वांच्या दैनंदिनीतील महत्त्वाची बाब आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृध्दी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे असे सांगून श्री. पाटील पुढे म्हणाले, ‘‘कचरामुक्त भारत’’ थीम असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान दरम्यान स्वच्छता मोहिमेला लक्ष केंद्रीत करुन ग्रामीण भागातील बसस्थानके, रेल्वेस्थानक, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तु, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले आदीसह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेकरीता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी महाश्रमदानात उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन गावे कचरामुक्त करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘‘स्वच्छता ही सेवा’’ हा उपक्रम संपूर्ण देशात सुरु आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने कारंजा या गावात स्वच्छतेची ही मोहिम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व अधिकारी या उपक्रमात सहभागी झाले. गावकऱ्यांनी यापुढे आपल्या गावात शाश्वत स्वच्छता राहील यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे यांनी केले.
यावेळी गोंदिया जिल्हा कचरामुक्त होण्याकरीता शाश्वत स्वच्छेबाबत सामुहिक शपथ घेण्यात आली. त्यानंतर कारंजा गावात शालेय विद्यार्थ्यांची स्च्छतेबाबत प्रभात फेरी काढून शाश्वत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा परिषदेचे माहिती शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी केले. कार्यक्रमास विस्तार अधिकारी आर.जे.बंसोड, सी.व्ही.गावड, कार्तिक चव्हाण, संगीता अग्रगवाल, स्वच्छता तज्ञ अभियंता सुर्यकांत रहमतकर, माहिती शिक्षण संवाद तज्ञ राजेश उखडकर, मुल्यमापन व सनियंत्रण तज्ञ विशाल मेश्राम, मनुष्यबळ विकास तज्ञ तृप्ती साकुरे, शालेय स्वच्छता तज्ञ भागचंद रहांगडाले, गट समन्वयक करुणा डोंगरे, उमेंद्र भगत, तेजप्रकाश पुंड, कांचन मेश्राम, अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी व कारंजा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.