तिरोडा – गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कार्यालय तिरोडा इथे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, तालुका प्रमुख रमेश टेभंरे, शहर प्रमुख पवन मोरे,प्रदेश प्रतिनिधी दुबे यांच्या उपस्तिथीत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
तालुका प्रमुख यांनी तिरोडा तालुक्यातील सात जिल्हा परिषद क्षेत्रात सात उप प्रमुख, सचिव, obc प्रमुख, सेवादल प्रमुख, तालुका महिला प्रमुख अशा अनेक समितीच्या गटन करून त्यांना अधिकारीकरित्या नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच प्रमाणे शहर प्रमुख पवन मोरे यांनी सुद्धा शहराची नवीन समितीची घोषणा केली.शहर महासचिव शिवा यादव, आणि सलाम भाई शेख,उपप्रमुख म्हणून प्रवीण शेंडे, संजय खियांनी, लेखराज हिरापुरे,प्रदीप उके, गुड्डू शेख,सचिव कमलेश मलेवार, लक्ष्मीकांत उरकुडे, गौरी कनेटकर, दीपक नंदेश्वर, प्रवीण चौहान, अंसूल केशरवानी यांना कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले. तर सह सचिव म्हणून रितेश मेश्राम, जितेंद्र बनसोड, आनंद मलेवार राजेश राणे यांना नियुक्त करण्यात आले.अनुसूचित जाती शहर प्रमुख संजय जांभुळकर तसेच सेवादल प्रमुख जनकलाल लिल्हारे यांची नियुक्ती करण्यात आली.
तिरोडा तालुका आणि शहर काँग्रेस नवीन समिती गठीत
वाढदिवसाच्या शुभेच्छा