क्षयरोग शोध मोहिम 03 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर जिल्ह्यात राबविली जाणार
गोंदिया-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात क्षयरोग शोध मोहिम 03 ते 13 ऑक्टोंबर जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्हा आरोग्य प्रशासन, जिल्हा क्षयरोग केंद्र, राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया यांच्या एकत्रित सहकार्याने सदर मोहीमेचे जनजागृती होण्याच्या दृष्टिकोणातुन 4 ऑक्टोंबर रोजी जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन केटीएस रुग्णालयात करण्यात आले होते.प्रभात फेरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी हिरवी झेंडी देवुन सुरुवात केली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी कापसे , जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मीना वट्टी, दंत व मूख रोग तज्ञ डॉ. अनिल आटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बि.डी. जयस्वाल, आयुष्मान योजनेचे समन्वयक डॉ. जयंती पटले, डॉ.स्नेहा वंजारी, डॉ. सुवर्णा उपाध्याय, सपना खंडाईत,प्रज्ञा कांबळे,आशिश बल्ले यांचेसह आरोग्य विभाग, के.टी.एस. रुग्णालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान ,क्षयरोग विभाग, कुष्ठरोग विभाग, आयुष विभाग, हिवताप विभाग, साथरोग असे आरोग्याशी निगडित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रभात फेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून निघून स्टेडियम मैदान, जयस्तंभ चौक भागात मुख्य रस्त्यावरुन ” टीबी हरेगा देश जितेगा” ह्या नाराने शहर दुमदुमले. टीबी चा मित्र निक्षय ,पोषण आहार योजना असे विविध संदेश जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीत बाई गंगाबाई स्त्री रुग़्णालयातील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी आदि उपस्थित होते.
समाजातल्या जास्तीत जास्त दानशूर लोकांनी प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानात सहभाग नोंदवावा आणि जास्तीत जास्त क्षयरुग्णांना दस्तक घ्यावे. तसेच क्षयरोग शोध मोहिमे दरम्यान आपल्या घरी येणार्या पथकाला खरी माहिती देवुन सहकार्य करुन जिल्हा टीबी मुक्त होण्यासाठी मदत करावी.
–अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद , गोंदिया