ओबीसी मंत्री सावेंना वसतीगृह सुरु करण्याचे ओबीसी युवा अधिकार मंचचे निवेदन

0
11

नागपूर,दि.06– राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागातंर्गत येत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांचा वसतीगृहाचा प्रश्नासोबतच स्वाधार योजना त्वरीत लागू करुन विभागातंर्गत करण्यात येणारी विविध पदावरील कंत्राटी पद्धतीची भरती रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आज नागपूर येथील महाज्योतीच्या कार्यालयात विभागाचे मंत्री अतुल सावे यांना देण्यात आले.ओबीसी युवा अधिकार मंच व स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमेश कोर्राम,पियुष आकरे,कृतल आकरे आदी यावेळी निवेदन देतांना उपस्थित होते.निवेदनात ओबीसींचे 72 वसतीगृहे, सावित्रीबाई फुले आधार योजना,विदेश शिष्यवृत्ती या योजना तात्काळ सुरू करणे,सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावे या मागण्यांचा समावेश होता.