गोंंदिया,दि.07ः तालुक्यातील सेजगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना योगेश्वर कंसरे यांना भ्रष्टाचारप्रकरणात तसेच सरपंच यांचे पती हे सातत्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजात ढवळाढवळ करीत असल्याने त्यांच्याविरुधद् करण्या आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने व लाचलुचपत विभागाने सरपंच पती व ग्रामसेवक यांना लाच घेतांना केलेल्या अटकेसह इतर मुद्यावर झालेल्या सुनावनीत अप्पर आयुक्तांनी सरपंच अर्चना कंसरे यांना सरपंच पदावरुन पायऊतार होण्याचा निर्णय पारीत केला आहे.नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्त माधवी खोडे यांनी आपल्या अहवालात अर्जदार चुन्नीलाल चौरावार यांचा अर्ज मान्यकरीत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल मान्य करीत गैरअर्जदार अर्चना योगेश्वर कंसरे यांना सरपंच पदावर अपात्र करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.