जिल्हा उद्योग केंद्राने व्यवसाय उभारण्यास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
4

एमएसएमई जागरूकता कार्यशाळा
गोंदिया- व्यावसायीक व उद्योगाशी संबंधित लाभार्थ्यांना जिल्हा उद्योग केंद्राने व्यवसाय उभारण्यास सहकार्य करावे, जेणेकरून गोंदिया जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात हातभार लागेल असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.
एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र शासनाची धोरणे व उपक्रम याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथील नियोजन सभागृहात कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
कार्यशाळेत १७५ हुन अधिक उद्योजक, व्यावसायीक क्लस्टरचे सभासद व महिला बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. ज्याप्रमाने कार्यशाळेचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे, व्यावसायीक व उद्योगाशी संबंधित लाभार्थ्यांना जिल्हा उद्योग केंद्राने व्यवसाय उभारण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले. जेणेकरून गोंदिया जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात हातभार लागेल असे ते म्हणाले. उद्योग सचांलनालयातील मैत्री कक्षाचे नोडल आॉफिसर म्हणून उद्योग अधिकारी एम. एल. साळवी हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यशाळेत केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकायांनी मार्गदर्शन केले. विवेक निर्माणश्वर मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह यांनी आयडीबीआय कॅपिटल बद्दल मार्गदर्शन केले. विनय अहिरवार प्रबंधक सिडबी यांनी सिडबीच्या योजना व सीजीटीएमएस योजनेवर विस्तृत मागदर्शन केले. मनीश तिवारी कॉलिटी कंट्रोल इंडियाचे कन्सल्टंट यांनी झेड सर्टिफिकेशन बद्दल उपस्थितांना माहीती दिली. ओएनडीसीचे अधिकारी धिरज कुमार यांनी त्यांच्या योजनांची माहिती दिली. डिजीएफटीच्या अधिका-यांनी निर्यात संबंधाने माहिती दिली. पोस्टाच्या अधिका-यांनी त्यांच्या विभागाच्या उद्योग संबंधाने योजना सादर केल्या.
गजानन अग्रवाल लाख उद्योजक व निर्यातक यांनी निर्यात करताना आलेले आपले अनुभव कथन केले. हुकुमचंद अग्रवाल अध्यक्ष एमआयडीसी अशोशिएसन यांनी जिल्हाच्या औद्योगिक विकासावर उहापोह केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुनेश्वर शिवनकर, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र गोंदिया यांनी केले. तर आभार संगिता ढोणे प्रकल्प अधिकार एमसीइडी गोंदिया यांनी मानले. कार्यक्रमाचे संचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.
0000