Home विदर्भ दिव्यांग विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वितरण

0
9

अर्जुनी मोर. :-समावेसित शिक्षण उपक्रमांतर्गत गटसाधन केंद्र पंचायत समिती अर्जुनी मोरचे वतीने दीव्यांग विद्यार्थ्याच्या शिक्षण व पुनर्वसनाकरिता विविध उपाययोजना राबविण्यात येतात.त्याच अनुसंघाने ६ ॲक्टोबर २०२३ ला गटसाधन केंद्र अर्जुनी मोर येथे प्राप्त झालेल्या १४ कमोड चेअरचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना करण्यात आले.या लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये तालुक्यातील अंगणवाडी व शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा समावेश होता.या सहित्यावितरण कार्यक्रमाप्रसंगी पंचायत समिती सदस्य संदीप कापगते अध्यक्षस्थानी तसेच विशेष अतिथी म्हणून गटविकास अधिकारी विलास निमजे,गटशिक्षणाधिकारी श्री.मांढरे,शिक्षण विस्तार अधिकारी बि.डब्ल्यू.भानारकर,गटसमन्वयक एस.एच.शहारे इ. मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.डी .कपगते यांनी केले तर प्रस्ताविक मनोगत कु. सी.एम . मेश्राम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार यु.एम. पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी व्ही.जी.मेश्राम,सी.जे. ढोके, कू.टी.एस. रामटेके, एम.एम.कोपुळवार, प्रमोद ब्राह्मणकर, आर.के. सहारे यांनी सहकार्य केले.