जीवित व वित्तीय हानी कमी करण्यासाठी दक्षता व जनजागृती महत्वाची शस्त्रे- पो.नि. बाजिया

0
36

सी. जे. पटेल महाविद्यालय, तिरोडा येथे NDRF पुणे तर्फे जनजागृती कार्यक्रम

बोदलकसा जलाशयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

गोंदिया दि.10 : आपत्ती सांगून येत नाही, आपत्तीचे स्वरुप मोठे किंवा लहान असले तरी आपत्तीचे पुर्व नियोजन करून जीवित व वित्तीय हानी कमी केली जाऊ शकते. मात्र दक्षता व जनजागृती हे आपत्ती व्यवस्थापनातील दोन महत्वपूर्ण शस्त्रे आहेत. आपत्ती काळात जनजागृती व दक्षता या दोन्ही शस्त्रांचा वापर करुन कोणत्याही नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीवर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पुणे चे पो.नि. मुकेश कुमार बाजिया यांनी, सी. जे. पटेल महाविद्यालय, तिरोडा येथे 9 ऑक्टोबर रोजी आयोजित जनजागृती कार्यक्रम केले.

यावेळेस तिरोडा तालुक्याचे तहसीलदार गजानन कोक्काडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मृत्युंजय सिंग, डॉ. किशन गावित प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पुढे मार्गदर्शन करताना बाजीया म्हणाले की, आपत्ती काळात परिस्थीतींना तोंड देण्यासाठी सुरक्षा व बचाव याबाबतची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. जीवित व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाने प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून तटस्थ भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. कारण जोपर्यंत मदत पोहोचत नाही, तोपर्यंत प्रथम प्रतिसादक म्हणून घटनास्थळी गरजूंना प्रतिसाद देणे आवश्यक आहे.

बाजिया यांनी आपल्या मार्गदर्शनात पूर परिस्थिती पासून सुरक्षा व बचाव, यावर करण्यात येणारी उपाययोजना, भूकंप दरम्यान घ्यावयाची दक्षता व उपाय, आगीच्या घटनेदरम्यान करण्यात करण्यात येणारी कृती, जखमींना प्रथमोपचार, कार्डियो पल्मनरी रेसॅसिटेशन (CPR- (Cardio pulmonary Resuscitation) तसेच घरगुती वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. सदर कार्यक्रमात सी. जे. पटेल महाविद्यालय, तिरोडा येथील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित यांचे आभार विकास आडे यांनी मानले.

बोदलकसा जलाशयात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक जनजागृती सोबतच प्रात्यक्षिक देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे बोदलकसा जलाशयात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पुणे यांच्या माध्यमातून उपस्थितांना बोटीद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या ठिकाणी बाजिया यांनी सजग नागरिक सुरक्षित नागरिक असे मनोगत व्यक्त करुन पुराचे प्रकार, पुर येण्याचे कारणे, धरणातून पाणी सोडण्याची पुर्व सूचना, हवामान खात्याचे अंदाज इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शोध व बचाव कार्य करताना घेण्यात येणाऱ्या आवश्यक दक्षतेच्या संदर्भात माहिती देऊन आपले अनुभव सांगितले. यावेळेस मंडळ अधिकारी राजेश बोडके, सहारे, राहांगडाले, तलाठी व कर्मचारी तसेच जिल्हा शोध बचाव पथकाचे नरेश उके, जसवंत राहांगडाले, संदिप कराळे, सुरेश पटले, दुर्गादास गंगापारी, राजाराम गायकवाड,चालक मुकेश अटरे, NRPF पुणे चे अधिकारी व कर्मचारी व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.