गोंदिया, दि.11 : नांदेड येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना आपापल्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी दि. 10 ऑक्टोंबर रोजी तालुका तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तिरोडा येथे सांयकाळी “सरप्राईज“ भेट देऊन पाहणी केली, तसेच कार्यालय प्रमुखांना तालुक्यातील आरोग्य संस्थेत आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक गुणवत्तापुर्वक सेवा देण्याचे निर्देश दिले.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय तिरोडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी भेट दिली असता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुबोध धोटे, आरोग्य सहाय्य्क लिलाधर निपाणे, लेखापाल मनोज सातपुडे, तालुका डेटा व्यवस्थापक माधुरी रहांगडाले,क्षयरोग पर्यवेक्षक अनुपम बंसोड, कनिष्ठ सहाय्यक अनिल उके,वाहन चालक विजय चंद्रिकापुरे व जियालाल कटरे उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी कार्यालय आतील व बाह्य स्वच्छता पाहणी करुन तालुक्यातील आरोग्य संस्थेत आयुष्मान भव मोहिमे अंतर्गत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड दारिद्ररेषेखालील 100 टक्के लोकांचे काढण्याच्या द्रुष्टीकोनातुन नियोजन करणे , आरोग्य संस्थेतील औषध साठा पर्याप्त प्रमाणात उपलब्ध बाबत , ई. विविध बाबीवर चर्चा केली. यावेळी श्री. पाटील यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधला व त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.