गोंदिया-पवार प्रगतिशील मंचच्या तत्वावधानामध्ये 2023-24 करीता विविध कार्यक्रमाच्या आयोजन राबविण्याकरीता पवार महिला समितीचे गठन करण्यात आले. ज्यामध्ये महिला समिती अध्यक्षपदी सौ.धनिषा संजय कटरे तर सचिव पदी सौ.आरती पारधी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच समितीच्या उपाध्यक्षपदी स्वाती बिसेन व दयावंती येळे, सहसचिव पदी- दीप्ती पटले, कोषाधक्ष – आरती चौधरी, संघटन सचिव- शेफाली बिसेन, प्रचार सचिव- मोरेश्र्वरी बिसेन तर सदस्य पदी- प्रीती बघेले, मिना टेंभरे, सुनीता ठाकूर, रीमा ठाकरे,एकता येडे, दुर्गेश्वरी पटले,कुंतन पटले, इंदू टेंभरे, विद्या ठाकूर, दुर्गा ठाकरे,वंदना बिसेन, लक्ष्मी ठाकूर, पूजा टेंभरे, एडवोकेट-राजकुमारी कटरे, डॉ.वृषाली चौधरी, माया पटले यांची निवड करण्यात आली.पवार प्रगतीशील मंचचे पदाधिकारी अध्यक्ष एड.पृथ्वीराज चव्हाण, सचिव सौ.प्रीती देशमुख (गौतम), पन्नालाल ठाकरे, बंटी बोपचे, अजय रहांगडाले, पंकज पटले, छत्रपाल चौधरी,दिलिप पारधी, संजू ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महिला समितीची निवड करण्यात आली.