तालुका व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी सोनवाने तर सचिव मनिष जैन

0
9
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगाव : गोरेगाव तालुक्यातील व्यापार्‍यांच्या समस्या व अडी-अडचणी मार्गी लावण्यासाठी एकसंघ होवून पुढाकार घेता यावे, या अनुसंगाने तालुका व्यापारी संघटना स्थापित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापार्‍यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत तालुका व्यापारी संघटनेची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी इसुलाल सोनवाने, उपाध्यक्ष जयमलसिंग सग्गु तर सचिव पदी मनिष जैन यांची तसेच सर्व पदाधिकार्‍यांची सर्वसमंतीने निवड करण्यात आली.
तालुका व्यापारी संघटना स्थापित करण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापार्‍यांची सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी इसुलाल सोनवाने हे होते. तर अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, सुरेंद्र पटले, तपेश टेंभरे, मुन्ना लिल्हारे, महेश बारेवार आदि उपस्थित होते. दरम्यान कार्यकारिणी गठीत करण्याच्या अनुसंगाने चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सर्वसंमतीने पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी इसुलाल सोनवाने, उपाध्यक्ष जयमलसिंग सग्गु, सचिव मनिष जैन, सहसचिव रूपेश रहांगडाले, कोषाध्यक्ष महेंद्र अग्रवाल तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मार्वंâडराव वैद्य, रामभाऊ अगडे, मनोहर रामटेके, तुषित पटले, संतोष रहांगडाले, अनिल मानकर, दिनेंद्र येडे, धनराज येरपुडे, मंगेश पटले, विक्की हरीणखेडे, योगेश बारेवार, जितू बिसेन यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीचे संचालन मनिष जैन यांनी केले. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पटले, प्रमोद मेश्राम, सतिश चौबे, फत्तेसिंग सग्गु, विकास साखरे, शिवा चन्ने यांनी परिश्रम घेतले.