जिल्हाधिकारी डॉ. चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते एकोडी येथे दुध संकलन केंद्राचे उदघाटन

0
7

दुग्ध व्यवसायातून होत आहे महीलांची आर्थिक प्रगति:जिल्हा परिषद सदस्या अश्विनी पटले
गोंदिया– एकोडी येथे महिला विकास महामंडळ गोंदिया व अदाणी फाउंडेशन तिरोडा यांच्या तांत्रिक सहाय्यातेने एकोडी येथे दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून महिलांकरीता रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांना दुधाचा योग्य भाव मिळायला हवे या उद्देशाने डेअरी सब सेक्टर अंतर्गत दूध संकलन केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार (बंटी) पटले,जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर,योगेश वैरागडे,प्रदीप कुकडकर,अदाणी फाऊडेंशनचे समन्वयक बिमुल पटेल,मोनिका चौधरी CMRC व्यवस्थापक अदानी फाउंडेशन तिरोडा,कुंदा डोंगरे,चित्रा जतपेले,कुंजलता भुरकुडे,हेमलता पडोळे,कार्यकारणीच्या सह्योगीनी लच्छू रिनायत,ललिता धूर्वे,वैशाली बिसेन,शितल पटले, मंगला तुरकर, ममता पटले,सहिस्ता शेख,उषा भगत, वैशाली बिसेन, सुनीता बाळणे,रायवंता बिसेन,सरोज मेश्राम व अमृता बिसेन उपस्थित होत्या.यावेळी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी रविकुमार पटले बोलल्या की दुग्ध व्यवसायातून आपल्या ग्रामीण भागातील महिला आर्थिक सक्षम होत आहेत.तसेच त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात सुध्दा भर पडत आहे. सोबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यात सुध्दा महिलांचा हातभार लागत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया ,अदानी फाउंडेशन तिरोडाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी व दुग्ध संकलन केंद्राच्या महीलांनी परिश्रम घेतले.