गोंदिया,दि.16-महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये नवीन राज्य कार्यकारणी गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानुसार महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य अधिवेशन नागपूूर येथील आमदार निवास येथे पार पडले.त्या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबई नागपूर विभागाच्या सहसचिवपदी सदर संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष आशिष प्र. रामटेके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आशिष प्र रामटेके हे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे देखील राज्य सहसचिव या पदावर कार्यरत असून जुनी पेन्शन योजना विषयक लढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.सदर नियुक्तीबद्दल श्री रामटेके यांचे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबईचे राज्य अध्यक्ष जीवन अहिर,किशोर हटकर सरचिटणीस,लक्ष्मण नरमवार कार्याध्यक्ष,विभागीय अध्यक्ष नागपूर विभाग तसेच राज्य समन्वयक राजूभाऊ धांडे,देवेंद्र शिंदोडकर जिल्हाध्यक्ष नागपूर, शैलेश धात्रक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,चंदू प्रधान जिल्हाध्यक्ष गडचिरोली,शिवशंकर साखरवाडे जिल्हाध्यक्ष भंडारा,राकेश डोंगरे जिल्हा सरचिटणीस गोंदिया आदींनी अभिनंदन केले आहे.