पवार नवयुवक समितीची कार्यकारिणी जाहीर

0
14

गोंदिया – पवार प्रगतीशील मंचच्या वतीने आर्थिक वर्ष सन २०२३-२४ साठी पवार नवयुवक समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी रजत गौतम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पवार प्रगतीशील मंचच्यावतीने आयोजित विविध प्रकारच्या कार्यक्रमात सहयोग देणे तसेच समाजाची प्रगती व्हावी, यासाठी युवकांच्या माध्यमातून समाजाला संगठीत कसे करता येईल, यासाठी या समितीकडून कार्य केले जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या समितीमध्ये अध्यक्षपदी गौतम, उपाध्यक्ष हेमंत बघेले, अंकुश पटले, सचिव मोहित बिसेन, सहसचिव विशाल पटले, संदीप पटले, कोषाध्यक्ष राहुल बघेले, संगठन सचिव अश्विन ठाकरे, प्रचार सचिव आशिष चौधरी, लिखेश रहांगडाले, शुभम बिसेन, सांस्कृतिक प्रमुख अश्विन ठाकुर, जय रहांगडाले, क्रीडा प्रमुख अभिनव टेंभरे, कौशिक बिसेन, शुभम रहांगडाले, अल्पोहार प्रमुख मंगेश रहांगडाले, प्रतीक बिसेन तर सदस्यपदी प्रणव बिसेन, राज पारधी, यश कटरे, प्रतीक बिसेन, चित्रसेन बिसेन, रोहन कटरे, विवेक बिसेन, हिमांशु पटले, शुभम गौतम, बंटी बिसेन, पारस बोपचे, प्रखर चव्हान, शरद सोनवाने, भाविक बिसेन यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त समितीच्या वतीने पवार प्रगतीशील मंचचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच नवयुवक समितीने समाज हितासाठी कार्य करावे, असे आवाहन पवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हान तसेच प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, यांनी केले आहे.