बालविवाह रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचा कॅन्डल मार्च

0
24

तिरोडा : बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी मुंडीकोटा पोलीस चौकी अंतर्गत मुंडेकोटा संपूर्ण गावातून कॅण्डल मार्च करण्यात आला.
समाज उपयोगी कार्य करण्यासाठी तिरोडा पोलीस सतत अग्रेसर असतात. लहान वयात मुलींचे लग्न झाल्याने त्यांच्या आरोग्यावर मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम होतो. लहान वयात लग्न केल्याने संपूर्ण समाजात मागासले पण येतो जी संपूर्ण समाजाच्या प्रगतीस अडथळा ठरते. यासंदर्भात कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक दलालवाड यांच्या नेतृत्वात पोलीस चौकी इन्चार्ज साठवणे, प्रतिमा जयतवर सरपंच ग्रामपंचायत मुंडीकोटा व पोलीस कर्मचारी तसेच मुंडीकोटापोलीस चौकी अंतर्गत येणारे सर्व पोलीस पाटील या कार्यक्रमाला उपस्थित होते.