पळसगाव डव्वा येथील वनदेवी सुवट पहाडी येथे रविवारला नवरात्रोत्सवानिमित्त जागरण कार्यक्रमाचे आयोजन

0
13

सडक अर्जुुनी-तालुक्यातील सुवट पहाडी शिवसागर तलाव पळसगाव डव्वा येथे नवरात्रो उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते होणार आहे.२२ आॅक्टोंबरला माॅं नर्मदा नमामी देवी जागरण गृपच्यावतीने जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजकुमार बडोले राहणार आहेत.यावेळी दीप प्रज्वलन आमदार सहषराम कोरोटे, जि.प. बांधकाम सभापती संजय टेंभरे, अनुराधा पाठक यांच्या हस्ते होणार आहे. मुर्तीपूजन माजी आमदार दिलीप बन्सोड व जि.प. सभापती सोनु कुथे यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाला  सहअध्यक्ष म्हणून जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, विशेष अतिथी म्हणून जि.प.सदस्य डॉ.भुमेश्वर पटले, डॉ. लक्ष्मण भगत, हनुवंत वट्टी, शैलेष नंदेश्वर,कविता रंगारी,किशोर महारवाडे,सुधाताई रहागंडाले,निशाताई तोडासे,माजी जि.प.उपाध्यक्ष छायाताई चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत.