“निरोगी आरोग्य तरुणाईचे , वैभव महाराष्ट्राचे “,विशेष अँंप च्या माध्यमातुन NATVM विशेष अँंपच्या निगराणीत आरोग्य तपासणी

0
23

गोंदिया दि.22 : सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात “आयुष्मान भव:” मोहीम दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर राबविण्यात येत आहे. मोहिमे दरम्यान “निरोगी आरोग्य तरुणाईचे ,वैभव महाराष्ट्राचे ” अभियानातुन 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम चार महिन्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी यावेळी दिली. NATVM विशेष अँंपच्या निगराणीत आरोग्य तपासणी होत आहे.
“निरोगी आरोग्य तरुणाईचे ,वैभव महाराष्ट्राचे ” अभियानातुन 18 वर्षावरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम जिल्हा भर राबविण्यास येत असुन साप्ताहीक आरोग्य मेळावे व विविध गावनिहाय तपासणी शिबीरा दरम्यान लोंकाची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिनेश सुतार यांनी दिली आहे.
शहरी व ग्रामिण भागातील विविध आरोग्य शिबीरातुन लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तपासणी शिबिरा दरम्यान मधुमेह ,रक्तदाब, क्षयरोग, अंससर्गजन्य आजार, सिकलसेल, मानसिक आजार, ,कुष्ठरोग,संसर्गजन्य आजार या बाबत विविध आजाराबाबत तपासणी करण्यात येत आहे. तसेच पोषण आहार, टेलीकन्सलटेशन , ई- संजीवनी ओपीडी , लसीकरण, निक्षयमित्र ह्याबाबत प्रतिंबधात्मक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय , ग्रामिण रुग्णालय ,प्राथमिक आरोग्य केंद्र. आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, नागरी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र ,आपला दवाखाना, आयुवेर्दिक दवाखाना अशा विविध आरोग्य संस्थेतुन पुरुषांची तपासणी करण्यात येत असुन आवश्यक शस्त्रक्रिया लाभार्थ्यांना वैद्यकिय महाविद्यालय येथे संदर्भसेवा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
आजारी पुरुषांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भीय करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील वय वर्ष 30 वरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, उपचार मोफत करण्यात येणार आहे. गरजेनुसार गंभीर आजारी रुग्णांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा अंगीकृत रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी दिली आहे.
सर्व अठरा वर्षावरील पुरुषांनी नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घेण्याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी आवाहन करण्यात आले आहे.