आ.विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून मोहगाव बूज येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत मोहगाव बूज.ते तुमखेडा खु.रस्ता रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली असून सदर रस्ता जिल्ह्याला जोडणारा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी होत होती व परिणामी नागरिकांना दळणवळणाकरिता फार मोठा त्रास सहन करावा लागे याची दखल घेत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी ग्रामविकास निधी अंतर्गत १.०० कोटी रुपये मंजूर करून सदर कामांचे भूमिपूजन आमदार हस्ते संपन्न झाले. सोबतच सिमेंट रस्ता (खोलगल्ली) २० लक्ष रुपये , कटंगी जलाशयाचा पाणीपुरवठा मोहगांव बु., हिरडामाली, तुमखेडा • धुंदाटोला, सर्वाटोला, पाणीपुरवठा योजना ३ कोटी रुपये • प्रभाग संघभवन १२ लक्ष रुपये, वंदनिय तुकडोजी महाराज चौक सौंदर्यीकरण ५ लक्ष रुपये, प्राथमिक शाळा मोहगांव शौचालय बांधकाम ६ लक्ष रुपये , वंदनिय तुकडोजी महाराज चौक सभामंडप ५ लक्ष रुपये ,बोरीटोला ते मोहगांव बु. सिमेंट रस्ता १० लक्ष रुपये , सभामंडप बांधकाम सर्वाटोला ५ लक्ष रुपये • सभामंडप बांधकाम धुंदाटोला ५ लक्ष रुपये, वंदनिय तुकडोजी महाराज चौक सोलार लाईट १ लक्ष रुपये , वर्गखोली दुरुस्ती प्राथमिक शाळा मोहगांव बु. ७ लक्ष रुपये आदी विकासकामे समाविष्ट आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटक पंकज रहांगडाले अध्यक्ष जि. प. गोंदिया, खोमेश्वर रहांगडाले माजी आमदार, गिरधारी बघेले स्भापती कृउबास गोरेगाव,मनोज बोपचे सभापती पं. स. गोरेगांव, सिताबाई रहांगडाले माजी जि. प. सदस्य, किशोर पारधी, सदस्य पं. स. गोरेगांव कमलेश रहांगडाले, उपसरपंच मोहगांव बु. ,गणराज पटले अध्यक्ष तं.मु.स.मोहगांव , ओमप्रकाश कटरे सदस्य पं. स. गोरेगांव ,संजय बारेवार,राणी रहांगडाले, ज्योतीका कुंभरे, सरपंच रंजुकुमार येडे,थानसिंग रहांगडाले,महेश चौधरी, हुमराज बावनकर, शिला राऊत,  मनोहर गौतम,दसाराम साऊसकर,  दुर्योधन पटले, बु. व समस्त ग्रामवासी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले आहे.