गोंदिया : पवार प्रगतिशील मंच तथा यूनाइटेड हॉस्पिटलच्या वतीने नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन २९ ऑक्टोबर रोजी स्थानिक पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे सकाळी १० वाजतापासून करण्यात आले आहे.
शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.दर्पण चौधरी, डॉ पराग जयपुरिया, डॉ.वैभव नासरे, डॉ.जूही भालोटिया, डॉ.शुभम पटले आदि रूग्णांची तपासणी करून उपचार करणार आहेत. शिबिरात दोन दिवस अगोदर प्रâी ब्लड टेस्ट, सीबीसी, fिलपिड प्रोफाइल, कोलेस्ट्रॉल, हीमोग्लोबिन क्रियेटिनिन आदिची तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराचा जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन किशोर भगत, बंटी बोपचे, रजत गौतम तथा पोवार प्रगतीशिल मंच, युवा समिती, महिला समिती तथा शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.