
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीवर जि.प.चा अधिकार,वाटणी नको
गोंदिया,दि.27ः- जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात आज शुक्रवारला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नवनियुक्त पालकमंंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोरच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी रोखठोक भूमिका घेत जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीवर जिल्हा परिषदेचा हक्क असून त्या हक्क अधिकारावर इतरांचा हक्क आम्ही स्विकारणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली.तर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीची प्रकिया सुरु करुन जिल्हा परिषद सदस्यांना तातडीने घेण्यात यावे,या मागणीचे निवेदनच सादर केले.तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतच्या 3054,5054च्या बदली कामाच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्याने नियोजन समितीने सभेत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीमध्ये 20 जिल्हा परिषद सदस्यांचा समावेस अध्यक्ष वगळता असतो.परंंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी लोटत असतानाही जि.प.सदस्यांना सामावून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वृत्त बेरार टाईम्सने 25 आॅक्टोंबरच्या अंकात प्रकाशित केले होते.त्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागडांने नियोजन समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांना त्वरीत संंधी देण्याची मागणी केली.यावर आता पालकमंंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.सोबतच जिल्हा परिषदेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बनगाव व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध या पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीकरिता शासनाकडून निधी प्राप्त होणे बंद झाल्यामुळे सदर योजना चालवण्यास जिल्हा परिषदेला अडचण निर्माण होत आहे.त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखभाल दुरुस्ती अंतर्गत चार कोटी रुपयांची मागणी पालकमंत्री आत्राम यांच्याकडे जि.प.अध्यक्ष रहागंडाले यांनी निवेदनातून केली.
यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समितीच्या 3054/5054 योजनेंतर्गतच्या निधीबाबत 40 टक्के जिल्हा परिषद,40 टक्के आमदार व 20 टक्के पालकमंत्री याप्रमाणे वाटप करुन नियोजन करावे अशी सुचना करताच जिल्हा परिषद अध्यक्ष रहागडांलेनी या निधीवर जिल्हा परिषदेचा हक्क असल्यानेे या योजनेच्या निधीचे कामाचे नियोजन पुर्णतःजिल्हा परिषदेला करु द्यावे अशी रोखठोक भूमिका घेतली.