गोंडवाना आदिवासी सास्कृतिक सभागृहाचे लोकार्पण

0
12

   गोंदिया, दि.28: देवरी येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण आज २७ ऑक्टोबर २०२३ रोजी आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते व गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे उपस्थितीत संपन्न झाले.

        आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी, आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास होण्याकरीता राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देवून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्याकरीता निधीची आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीमध्ये प्रस्ताव सादर करण्यात यावा किंवा पुरवणी मागणीमध्ये आवश्यक निधीची मागणी करावी, त्यानुसार मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच आश्रमशाळेतील शैक्षणिक गुणवता शंभर टक्के सुधारणा होण्यासाठी योग्य ‍नियोजन करीत येत असुन विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुध्दा आपली मुले नियमीत शाळेत पाठविण्यात यावेत, यासोबत त्यांचे (गोंडी) बोली भाषेमध्ये पुढील वर्षापासून शिकविण्याचे  नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.

        खासदार अशोक नेते म्हणाले, या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर आदिवासी सांस्कृतिक सभागृह मंजूर करण्याकरीता व निधी उपलब्ध करुन देण्याकरीता माझ्या वतीने मंत्री महोदयांना विनंती करीत असुन प्रत्येक तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर आदिवासी  सांस्कृतिक सभागृहाची निर्मीतीची आवश्कता आहे, जेणेकरुन  आदिवासी समाज बांधवास स्वंतत्ररीत्या सदर सभागृहामध्ये कार्यक्रम करण्याकरीता सोईचे होईल असे त्यांनी सांगितले.

        एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प देवरी च्या वतीने जिल्हा वार्षिक  आदिवासी उपयोजना अंतर्गत देवरी येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम मागील एक ते दिड वर्षात काम पुर्ण करुन आज २७ ऑक्टोबर २०२३ रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

        प्रास्ताविकातून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी आदिवासी समाजासाठी स्वतंत्ररीत्या सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रम आयोजित करता येईल याकरीता मागील एक ते ‍दिड वर्षात सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम पुर्ण करुन आज लोकार्पण करण्यात येत आहे याचा मला अत्यंत आनंद होत असुन यापुढे सुध्दा प्रत्येक तालुकास्तरावर आदिवासी समाजासाठी स्वतंत्ररीत्या सांस्कृतिक सभागृहाची आवश्यकता असुन ‍मंत्री महोदयांनी निधी मंजूर केल्यास इतर तालुक्याच्या ‍ठिकाणी सुध्दा सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करता येईल अशी विनंती केली.

       कार्यक्रमास दशरथ कुळमेथे, उप आयुक्त आदिवासी विकास नागपूर, पुजा धुर्वे सभापती समाज कल्याण गोंदिया, संजू उईके अध्यक्ष नगरपंचायत देवरी, अंबिका बंजार सभापती पंचायत समिती,  श्री. धाबे मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम, श्री. अंजनकर, तुळशीराम सलामे, कौशल्या कुंभरे तसेच‍ देवकी मरई, झामसींग येरणे, प्रज्ञा सांगीडवार उप नगर अध्यक्ष व आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.