गोंदिया,-जिल्हा नियोजन समितीमध्ये अध्यक्ष वगळुन 20 जि. प. सदस्यांचा समावेश असतो. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी लोटून सुध्दा जि.प. सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत सामावून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. जि.प. सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत नेमणुक न केल्यामुळे ग्रामिण क्षेत्रातील विकास कामावर प्रतिकुल परिणाम होत आहे. तरी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया अविलंब सुरु करुन जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत स्थान देण्यात यावे. बेरार टाईम्सने यासंदर्भात सातत्याने लक्ष वेधले आहे.
तसेच जिल्हा परिषदे मार्फत जिल्हा वार्षीक योजने अंतर्गत विविध योजना राबविण्यांत येत असतात. सदर योजनेचे नियोजन व कामे जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत करण्यांत येत असतात. सदर योजने अंतर्गत मंजुर नियतव्ययाच्या अधिन राहून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण समिती सभेची मंजुरी प्रदान करून योजनेनुसार कामाची अंतिम निवड यादी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा नियोजन समिती कडे मंजुरीस्तव पाठविण्यांत येत असुन यादीनुसार कामांना जिल्हा नियोजन समितीने मंजुरी प्रदान करणे अभिप्रेत आहे. तथापि, शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर, 2014 मधील अ.क्र. 3 व 4 मध्ये नमुद तरतुदी प्रमाणे कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
करिता स्थानिक स्वराज संस्थेतील जि.प. सदस्यांना जिल्हा नियोजन समितीत नेमणुकीकरीता संबधीतांना योग्य निर्देश अविलंब निर्गमीत करण्यात यावे तसेच शासन निर्णय दिनांक 17 डिसेंबर, 2014 मधील अ.क्र. 3 व 4 मध्ये नमुद तरतुदीचे तंतोतर पालन करण्यात यावे अन्यथा तसे न झाल्यास उपोषण करण्यात येईल. किंवा न्यायलयीन मार्गाने प्रकरण तडिस नेण्यात येइल याची जाणिव मा. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती यांना निवेदनाद्वार करुन देण्यात आली आहे.
निवेदन देतांना सर्वश्री जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, योपेन्द्रसिंह (संजय) टेंभरे बांधकाम सभापती, रुपेश (सोनू) कुथे कृषी व पशुसंवर्धन सभापती, प्रविण पटले सदस्य, संदिप भाटीया सदस्य सौ. दिपा चंद्रिकापुरे सदस्य, सी, ममता वाळवे सदस्य, सी. रजनी कुंभरे सदस्य, सौ. जयश्री देशमुख सदस्य, कु. आनंदा बाडीवा सदस्य, सी. चंद्रकला डोंगरवार सदस्य, अँङ माधुरी रहांगडाले सदस्य, जितेन्द्र कटरे सदस्य, डॉ. लक्ष्मण भगत सदस्य, रितेशकुमार मलगाम सदस्य, सौ. उषा शहारे सदस्य, सौ. राधिका धरमगुळे सदस्य, सौ. विमल कटरे सदस्य, सौ. अंजली अटरे सदस्य, सौ. निशा तोडासे सदस्य, किशोर महारवाडे सदस्य, सी. प्रिती कतलाम सदस्य, सौ. लक्ष्मी तरोणे सदस्य, चर्तभुज बिसेन सदस्य, विजय उईके सदस्य, सौ. कल्पना वालोदे सदस्य, शैलेश नंदेश्वर सदस्य, सशेन्द्र भगत सदस्य, सौ. वंदना काळे सदस्य, सौ. छाया नागपुरे सदस्य, सौ. गिता लिल्हारे सदस्य, सौ. छबुताई उके सदस्य, सौ. कविता रंगारी सदस्य, डॉ. भुमेश्वर पटले सदस्य सौ. सुमेश्वरी बघेले सदस्य सौ. उषा मेंढे सदस्य, सौ. वैशाली पंधरे सदस्य, लायकराम मेंढे सदस्य हे उपस्थित होते.