येडमागोंदि-कडीकसा रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

0
8

देवरी,दि.३०- तालुक्यातील येडमागोंदि ते कडीकसा या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आमदार सहसराम कोरोटे यांचे हस्ते गेल्या काल रविवारी (दि.२९) करण्यात आले.

या भूमिपूजन प्रसंगी जि.प. सदस्य उषा शहारे, पंस सदस्य अनुसया सलामे, रंजित कासम, मिसिपिरीचे सरपंच सरवंती उसेंडी, कडीकसाचे सरपंच रमशीला कोरेटी, मिसपिरीचे उपसरपंच जीवन सलामे, गिरधारीलाल कळसाम. नम्मू शिखशेदूर बंशी सलामे, माणिक वालजे, मनोहर वालदे, सुदाम भोयर, कुमारसाय ताराम, नरेंद्र सांडील, संजय ताराम, माधो सलामे, मानसिंंग टेकन, शिवप्रसाद हिरवानी, इंद्रदास मडावी, नारायण सलामे, राजेंद्र लाडे,कौसल टेकन, सुखदेवजी वालदे, मा. दुर्गेशजी कुंभरे तसेच परिसरातील मंडळी उपस्थित होते. या कामावर ३ कोटी ३६ लाख रुपयाचा निधी प्रस्तावित आहे.