भंडारा, दि.1 :राज्य परिवहन महामंडळातर्फे भंडारा आगाराचा दिवाळीनिमित्त प्रवाशांकरीता भंडारा ते पुणे नविन निमआराम बससेवा सुरू करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
ही बससेवा 7 ते 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 व 2 वाजता भंडारा बसस्थानक येथुन सोडण्यात येईल.तर पुणे येथुन भंडाराकरीता दि.8 ते 11 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 5.15 व 6.15 वाजता बसफेरी सोडण्यात येणार आहे.या बसचे तिकीट भाडे 1620 रूपये राहणार आहे.
तसेच नागपूर येथुन पुणेकरीता दुपारी 2 व 3.30 वाजता बसफेरी सोडण्यात येणार असून त्याचे तिकीट भाडे 1485 राहणार आहे.सुरक्षीत प्रवासाकरीता जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा ,असे आवाहन भंडारा आगार व्यवस्थापक विरेंद्र गभणे व बसस्थानक प्रमुख रिक्की बोधनकर यांनी केले आहे.