शेंन्डा : राणी दुर्गावती लोकाप्रती समर्पित योध्दा म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांनी आपल्या लोकांच्या भल्यासाठी मुघलांपासून आपले राज्य वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला आणि शेवटी गंभीर जखमी होऊन राणी दुर्गावतीनी स्वतःचे बलिदान दिले आणि हौतात्म्य पत्करले.देशासाठी बलिदान दिलेल्या राणी दुर्गावतीचा इतिहास जगासमोर आले पाहिजे असे प्रतिपादन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
शेंडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी व कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्था यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आदिवासी वीरांची स्मरणगाथा अभियाना अंतर्गत महाराणी दुर्गावती महानाट्यप्रयोगाच्या आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी माजी मंत्री राजकुमार बडोले बोलत होते.
याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये,जिल्हा परिषद सदस्य चंद्रकलाताई डोंगरवार ,संरपच ग्यारशी रामरामे सरपंच शेंडा,नाट्य लेखक मडावी,माजी सरपंच मोहन बोरकर,सुरेशजी बारशे,संतोषजी रामरामे,पोलीस पाटील अमोल मानवटकर,मार्तंड परिहार,शोभेलाल मरसकोल्हे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.