भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

0
11

गोंदियादि. 03 : देशभर 30 ऑक्टोबर  ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे.गोरेगाव,  सडकअर्जुनी , सालेकसा व आमगाव तहसील कार्यालय , पंचायत समिती कार्यालय, नवेगावबांध व आमगाव पोलिस स्टेशन येथे तसेच स्थानिक मार्केट परिसरात व शासकीय कार्यालयांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधून भित्तिपत्रके व पत्रके यांचे वाटप करण्यात आले तसेच नागरिकांना तक्रारी असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग गोंदिया येथे तक्रार नोंदवण्यासाठी प्रोत्साहित केले.

राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतानाभ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कार्यालय किंवा ऑफिसमध्ये कोणीही आपले काम करण्याकरता पैशाची किंवा लाचेची मागणी करत असल्यास/ कामाची अडवणूक करत असल्यास त्वरित अँटी करप्शन ऑफिस, गोंदिया येथे संपर्क साधावा.
ऑफिसला प्रत्यक्षात येणे शक्य नसल्यास खालील मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा. आपल्याकडे येऊन तक्रार घेतली जाईल व तात्काळ कारवाई करण्यात येईल.

१) .टोल फ्री नं. 1064

२) मा.श्री राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपुर/99232 52100,

३) मा.श्री सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नागपुर / 8830379471

4) श्री विलास काळे पोलिस उपअधीक्षक ला. प्र. वी. गोंदिया. /9867112185.

5) श्री अतुल तवाडे पो.नि. ला.प्र.वि.गोंदिया/9370997485

6) श्री उमाकांत उगले पो.नि.ला.प्र.वि.गोंदिया/9664959090.

आपले कार्य करण्यासाठी कोणी पैशाची/लाचेची मागणी करत असल्यास किंवा पैशासाठी आपल्या कामाची अडवणूक करत असल्यास तात्काळ ACB शी संपर्क साधावा.

संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा@mahapolice.inफेसबुक http://www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.net, एक्स (ट्विटर) – @ACB_Maharashtra यावर संपर्क साधावा.