देवेंद्र रामटेके
गोंदिया(ता.3)-आपल्या गावातील नागरिकांना शुद्ध व थंडगार पाणी (आरोयुक्त) उपलब व्हावे अशी ग्रामपंचायत प्रशासनाची धडपड होती. त्याच अनुसंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या गावातील नागरिकांना अगदी अल्प दरात शुद्ध व थंडगार पाणी (आरोयुक्त) उपलब्ध करून दिले. आता गावातच सुद्धा व थंडगार पाणी मिळत असल्याने गोंदिया तालुक्यातील अंभोरा येथील नागरिक भारावले आहेत.
आपल्या गावातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मागच्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. अशातच पंधरा वित्त आयोगाची निधी उपलब्ध होताच त्यातून जवळपास चार लक्ष रुपये खर्च करून गावातील ग्रामपंचायत परिसरात आरो प्लांट बसविण्यात आले. त्यातून सुद्ध आणि तेही थंडगार पाणी अगदी अल्प दरात गावकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता गावातच थंडगार पाणी तेही अगदी अल्प दरात उपलब्ध होत असल्याने गावकरी दररोज पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करित आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या घरातील आयोजित समारंभात सुद्धा सदर पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करित आहेत. गावातच आरो चे पाणी आणि तेही अगदी अल्प दरात उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांची मोठी आर्थिक बचत होत आहे. एवढेच नव्हे तर गावात होणाऱ्या मृत्यू, लग्न, तथा इत्तर समारंभात अगदी अल्प दरात मिनी टॅंकरद्वारे ग्रामपंचायत प्रशासन गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देत आहे. ग्रामपंचायत प्राशासना द्वारे करण्यात येत असलेल्या लोकोपयोगी कार्यामुळे येथील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहे. गावात विविध सुविधांची निरंतर पूर्तता व्हावी म्हणून येथील सरपंच जाननबाई लक्ष्मण चौधरी, उपसरपंच सारिका सावनकर, सदस्य राजेश रामटेके, सुरेश भिमटे, चिंतामण चौधरी,अश्वजीत गणवीर, रीता चौधरी, खुमेश्वरी चौधरी,विमल रामटेके, बिपतबाई पटले, ग्रामसेवक दीपक रेवतकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चौधरी, ग्रा.पं.कर्मचारी जाफर शेख, प्रमोद काटेकर, अशोक श्यामकुवर प्रयत्नशील आहेत.