एल.यु.खोब्रागडे अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे धनी : किशोर डोंगरवार

0
9
शिक्षक समिती, शिक्षक संघ व जैन कलार समाजाच्या वतीने सेवानिवृत्तीपर जाहिर सत्कार
गोंदिया : ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही घडलो, मोठे झालोत. ज्यांनी आम्हाला संघटना व पतसंस्थेच्या विविध पदावर आरूढ होण्यास सिंहाचा वाटा असणारे शिक्षक समितीचे माजी जिल्हा सरचिटणीस एल.यु.खोब्रागडे यांनी संघटनेच्या केंद्र, तालुकापासून जिल्हापर्यंत विविध पद भुषविले आहे. शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस पतसंस्थेचे संचालक, जिल्हा परिषद शिक्षण समितीचे आमंत्रित सदस्य, खेळोत्तेजक मंडळाचे आजीवन सदस्य तर आता ते जैन कलार समाज गोंदियाचे जिल्हाध्यक्ष पदावर आहेत. असे हे अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे धनी आहेत, असे उद्गगार शिक्षक सह.पतसंस्थेचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी व्यक्त केले.
जैन कलार समाज भवन गोंदिया येथे आायोजित सेवानिवृत्ती कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना प्रमुख अतिथी पदावरून ते बोलत होते. शिक्षक समितीचे माजी जिल्हा सरचिटणीस एल.यु.खोब्रागडे यांचा सेवानिवृत्ती समारोह आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सभापती मुनेश रहांगडाले होते. तर विशेष अतिथी म्हणून आ.विनोद अग्रवाल यांचे प्रतिनिधी रोहित अग्रवाल, अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य शैलजा सोनवाने, उपमुख्य कार्यपालन अधिकारी नरेश भांडारकर, शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष मनोज दिक्षित, समितीचे जिल्हाध्यक्ष संदिप तिडके, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावणकर, जैन कलार समाज गोंदियाचे सचिव शालिकराम लिचडे, उपाध्यक्ष शोभेलाल दहिकर, सेवानिवृत्त संघटनेचे कोषाध्यक्ष डी.एल.गुप्ता, भंडारा पंचायत समितीचे माजी गटशिक्षणाधिकारी शामकर्ण तिडके, भंडाराचे माजी खंडविकास अधिकारी चिंधूजी आदमणे, सत्येंद्र मुरकूटे, ज्ञानीराम आसटकर, सुखराम हरडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वप्रथम खोब्रागडे परिवाराकडून आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तदनंतर प्रास्ताविकातून डी.एल.गुप्ता यांनी खोब्रागडे यांच्या जीवनाावर प्रकाश टाकला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, म.रा.प्राथमिक शिक्षक संघ, जैन कलार समाज गोंदिया, सर्व तालुका संघटना, इष्टमित्र व शुभचिंतकांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सपत्नीक जाहिर करण्यात आला. त्याचप्रमाणे आमदार विनोद अग्रवाल यांचे प्रतिनिधी रोहित अग्रवाल व सभापती मुनेश रहांगडाले यांनी सुध्दा जाहिर सत्कार केला. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त शिक्षक एल.यु.खोब्रागडे यांच्या सेवाकार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन उमेश भांडारकर तर आभार प्रदर्शन यशोधरा सोनवाने यांनी केले. कार्यक्रमाला संघटनेचे सर्व तालुका, जिल्हा पदाधिकारी व समाजाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, आप्तेष्ठित, मित्र परिवार व घनश्याम खोब्रागडे, आशिष खोब्रागडे, डॉ.अश्विनी तिडके उपस्थित होते.
००००००००००