खैरबंदा जलाशय वितरण प्रणालीची दुरुस्ती करा-आ. विजय रहांगडाले यांची सचिवांसोबत बैठक

0
17

तिरोडा:-गोंदिया तालुक्यातील तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात येणारा खैरबंदा जलाशय स्वातंत्र्य पूर्व काळातील असून या प्रकल्पाचे बांधकाम इ. स.1915मध्ये पूर्ण झाले या जलाशयाची मूळ प्रकल्प सिंचन क्षमता 5762 हेक्टर होती परंतु जलाशयात उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात सरासरी 3606 हेक्टर सिंचित करण्यात येत होते व उर्वरीत 2156 हेक्टर सिंचनापासून वंचित राहत होते सदर तफावत दूर होण्याकरिता तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सण 2018 मध्ये धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्र.1 चे पाणी ऊर्ध्वनलिकेद्वारे 18 कि.मी.अंतरावर खैरबंदा जलाशयात सोडले यामुळे वैनगंगा नदीतून 31.25 द.ल. घ. मी. पाण्याचा उपसा सिंचन होऊन 2156 हे. क्षेत्र सिंचित करण्यात आले खैरबंदा जलाशयाअंतर्गत वितरण प्रणाली अत्यंत जुनी असून जीर्ण अवस्थेत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना व्यवस्थित पाणी मिळत नसून बहुतांश क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे व परिणामी सदर कालव्याची उपयुक्तता कमी झाल्याची दखल घेत आमदार विजय रहांगडाले यांनी आणि प्रकल्प संचालक  राजेंद्र मोहिते व मध्यम प्रकल्प मुख्य अभियंता विमुलकोंडा याचेशी आज मंत्रालयात चर्चा करून सदर बाब निदर्शनास आणून दिली व खैरबंदा जलाशय कालवा वितरण प्रणाली दुरुस्ती करिता निधी मंजूर करण्याबाबत मागणी केली .यावर संचालक यांनी तातडीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहे. सदर वितरण प्रणालीची दुरुस्ती होऊन खैरबंदा जलाशयाअंतर्गत लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांला सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होणार आहे.