मॅडम माझा वाढदिवस कधी??

0
25

तसं बघितलं तर वाढदिवस हा सर्वांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वपूर्ण दिवस!! तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार असे गाणं मनात गुण गुणत तो दिवस आपण आनंदात साजरा करतो. आपले प्रियजन या दिवशी आपला वाढिवस खुप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. या दिवशी विशेष आनंद होत असतो ते म्हणजे आपले आपले आई आणि वडील यांना!!! पण जेंव्हा आई वडील या दोघांपैकी एक जण जरी नसले तरी आपले मन त्यांची आठवण नक्कीच काढते. पण जेंव्हा दोघेही नसतात तेव्हा…
तेंव्हा मात्र मनाच्या तळाशी दुःखाची एक लकेर बसलेली असते.
जिल्हा परिषद शाळा नं १. कवठे एकंद या शाळेत इयत्ता पहिली मध्ये शिकणारा रीहान करण घाडगे या विद्यार्थ्याला आई वडील दोघेही नाहीत. त्या निरागस मनाला इतर मुले वाढदिवसाच्या दिवशी चॉकलेट वाटतात इतकंच माहीत. तेंव्हा तो वर्गशिक्षक परीट मॅडम यांना नेहमी म्हणायचा मॅडम मी अशी चॉकलेट कधी वाटणार ? माझा वाढदिवस कधी येणार ? घरची परिस्थिती बेताची असल्याने कधी कधी कपडे वेळेवर मिळाले नाहीत त्यामुळे हौस मौज या गोष्टी खुप दूरच्या. शाळेचे मुख्याध्यापक यांनी एक ड्रेस देण्याचे कबूल केले कपडे आणण्यासाठी सिद्धराज कलेक्शन येथे गेले असता त्यांनीही माहिती घेतली व त्यांनीही रिहानला एक ड्रेस देण्याचे कबूल केले मग काय लगेच केक आणि चॉकलेट हजर झाले. आज दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी हा आगळावेगळा वाढदिवसाचा कार्यक्रम इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये आनंदाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सिद्धराज क्लॉथ स्टोअर्स येथील पुनम पाटील मॅडम स्वतः शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिल्या त्याच बरोबर कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य श्री.संतोष आठवले , श्री.जावेद जमादार, श्री. तानाजी शिरतोडे,विशाल खाडे व मुख्याध्यापक श्री राजेंद्र सागरे सर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता सर्वांनी रिहानला शुभाशीर्वाद दिले.
शेवटी रिहानला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता त्याचं मोल कोणत्याही रकमेत किंवा शब्दात करता येणार नव्हतं.

शब्दांकन – श्री.विशाल रंजना विष्णू खाडे.(उपशिक्षक)