धान विक्रीकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

0
19

गोंदिया,दि.9 : शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदीकरीता NEML पोर्टलवर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे ऑनलाईन शेतकरी नोंदणी करतांना हंगाम 2023-24 पासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 उतारा आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्यांनी लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहून 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावीत.

      शेतकऱ्यांनी तालुक्यातील नजिकच्या मंजुर आधारभुत धान खरेदी केंद्रावर खरीप पणन हंगाम 2023-24 मधील पीक पेरा असलेला 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी घेवून जावेत व विहीत मुदतीत नोंदणी करावी. बिगर आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांनीच मार्केटींग फेडरेशनच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी व शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.

      नोंदणीसाठी मंजुर खरेदी संस्थांच्या गावांची नावे :- बिरशी, छोटा रजेगाव, दांडेगाव, डोंगरगाव, कोरणी, रापेवाडा, सेजगाव, तुमखेडा, खर्रा, पिंडकेपार, शिरपुर, किन्ही, धापेवाडा, छिपीया, गर्रा बुज., गुदमा, पांजरा, सावरी, पांढराबोडी, नागरा, नंगपुरा मुर्री, कामठा, खातीया (परसवाडा), मुंडीपार (एमआयडीसी), गोंदिया, मोहगाव, धुंडाटोला, बोरगाव, घोटी, तुमसर, आंबेतलाव, कवलेवाडा, शहारवाणी, घुमर्रा, चिल्हाटी कवडीटोला, गोवारीटोला, तेढा, कुऱ्हाडी, हिरडामाली, मोहाडी, मोहगाव तिल्ली, इसाटोला, सोनेगाव, पुरगाव, चोपा, गिधाडी, गोरेगाव, गणखैरा, कालीमाटी गोरेगाव, सर्वाटोला, तिमेझरी, गोंदेखारी, अर्जुनी, बोंडराणी, बोरा तिरोडा, सुकडी डाक., सरांडी, आलेझरी तिरोडा, सतोना तिरोडा, मलपुरी, डोंगरगाव, पिपरीया, पांजरा तिरोडा, करटी बुज., मेंढा, करटी खुर्द, चिखली, बघोली, बिरसी, वडेगाव, विहिरगाव, नवेझरी, बोदलकसा, खुर्शीपार, मरारटोला, ठाणेगाव, बेलाटी, बेरडीपार, भिवापूर, बरबसपुरा, खमारी, बनगाव, धामणगाव, घाटटेमणी, पानगाव, किंडगीपार, किकरीपार, माल्ही, गणेशपूर, भजियापार (आमगाव), जामखारी, खुर्शीपार, दहेगाव, सरकारटोला, शिवनी, टेकरी कालीमाटी, आमगाव, अंजोरा, गोरठा, कालीमाटी (आमगाव), कट्टीपार, सुपलीपार, तिगाव, वळद, आमगाव खुर्द, घोंशी, खेडेपार, रोंढा, सोनपुरी, बाम्हणी (सालेकसा), पाऊळदौना, लटोरी, कोटजांभोरा, हरदोली, पांढरी, फुटाळा, गोंगले, मालीजुंगा, म्हसवाणी, सिंदीपार, सितेपार, वडेगाव (सडक अर्जुनी), बाम्हणी (सडक अर्जुनी), सौंदड, डुंडा, घाटबोरी, गिरोली हेटी, धानोरी, घटेगाव, निमगाव, भिवखिडकी, अर्जुनी मोरगाव (लक्ष्मी), अर्जुनी मोरगाव (खरेदी विक्री), बाकटी, बोंडगाव देवी, धाबेटेकडी, महागाव, नवेगावबांध, वडेगाव रेल्वे.