गोंदिया जिल्ह्यात बळीराजा महोत्सवाचे ठिकठिकाणी आयोजन,अल्पोपहाराचे वितरण

0
11

गोंदिया- दरवर्षी आपण दिवाळीला बळीपूज करतो परंतु कृषी संस्कृतीच्या महानायक ,महासम्राट बळीराजा 3000 वर्षांपूर्वी जनकल्याणकारी,बहुजनवादी, हितवादी राजा होऊन गेला. बळीपूजन करून त्यांना स्मरून आपण सर्व दिवाळी साजरी करूया असा संकल्प बळीराजा महोत्सव प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी केले.

गोंदिया जिल्ह्यात ओबीसी अधिकार मंच,बहुजन युवा मंच,ओबीसी सेवा संघ,ओबीसी संघर्ष समिती,सर्वसमाज ओबीसी मंच,स्टुटडंस राईटस असो.,भारतीय पिछडा शोषित संघ,ओबीसी जनमोर्चा ,सविंधान मैत्री संघ,सत्यशोधक समाज आदी समविचारी संंघटनांच्याच्य संयुक्त विद्यमाने बळीराजा महोत्सव कार्यक्रम गोंदिया जिल्हयातील गोंदिया जयस्तंभ चौक बसस्थानक परिसर,सौदंड,इटखेडा,गोरेगाव,आमगाव आदी ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
जयस्तंभ चौक बसस्थानक येथे बळीराजा दिनविशेष , चित्राचे विमोचन करण्यात आले .यावेळी खेमेंद्र कटरे म्हणालेत की भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात मोठा सण दिवाळी असून यावेळी आपण बळीराजाचे पूजन करतो .भाऊबीजेला बहीण भावाची ओवाळणी करते. आपण ईडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतो .परंतु वस्तुस्थितीमध्ये बळीचे चित्र कृषी संस्कृतीला कळले पाहिजे.
कष्टकरी, शेतकऱ्यांची संस्कृती आजची कृषी संस्कृती .तीच बळीवंश.बळीराजा आपला महानायक असून आजची शेतकऱ्याची स्थिती भयावह आहे .प्रत्येकाला बळीचे राज्य येवो ही अभिलाषा आहे.त्यामुळेच आपण सर्व बळीचे राज्य येऊ ही संकल्पना धारण करतो.यावेळी खेमेंद्र कटरे,कैलास भेलावे,सुनिल भोंगाडे,लिलाधर पाथोडे,रमेश ब्राम्हणकर,तिर्थराज उके,पी.डी.चव्हाण,सविताताई बेदरकर,उमेंद्र कटरे,रवि भांडारकर,प्रेम साठवणे,प्रमोद गुडधे,सी.पी.बिसेन,प्रमोद बघेले,श्री फरकुंडे,परेश दुरुगकर,महेंद्र बिसेन,भागचंद रहागंडाले,हरिष मोटघरे,मंगेश शेंडे,श्री.मेश्राम,श्री.हुकरे आदी बहुजन ओबीसी बंधू भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.