सृजन सामाजिक संस्थेतर्फे अनाथ मुलांसाठी 45000 हजार रुपयांची मदत डॉ. सविता बेदरकर यांना सुपूर्द….

0
8

दिवाळी उत्सव: एक दिवा मानवतेचा’ कार्यक्रमाला  शिक्षण विभागातील दान दात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद….

गोंदिया, (दि. 14 नोव्हेंबर): पहांदी पारो कुपार लिंगो बहुउद्देशिय संस्थेच्या संस्थापिका प्रा. डॉ. सविता बेदरकर यांच्या पुढाकाराने आयोजित कोरोना एकल महिला, अनाथ मुलांसह दिवाळी मनोमिलन या सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सृजन सामाजिक संस्थेने समाजातील दान दात्यांकडून आवाहनाद्वारे पंचेचाळीस हजार रुपये मदत गोळा करून डॉ. सविताताई बेदरकर यांना उपस्थित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत व इतर दान दात्यांच्या हस्ते चेक सुपूर्द केला.

जन्मदात्यांचे छत्र हरविलेल्या अनाथ मुलांच्या व्यावहारिक जीवनात दिवाळीचा गोडवा निर्माण करण्याचे काम प्रा. सविता बेदरकर मागील काही वर्षांपासून दिवाळीच्या पर्वावर मनोमिलनाचा कार्यक्रम घेत असतात. यावर्षी दि. 9 नोव्हेंबर रोज गुरुवार ला डॉ. बेदरकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी व मराठी चित्रपट बोर्डाच्या सदस्या जयश्री गावंडे (कापसे) उपस्थित होत्या.

यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार यांच्या पत्नी सौ. सविता विनोद अग्रवाल, विशेष समाज कल्याण अधिकारी विनोद मोहतुरे, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, समाजशील सेवानिवृत्त शिक्षक अनिल मेश्राम, प्राचार्य माधुरी नासरे, साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, चोथराम गोपलानी, सीमा  डोये, भगवान नंदागवळी, मधुसूदन दोनोडे, प्रमोद गुडधे, वंदना सेलोकर, शिक्षिका नाननबाई बिसेन, यशोधरा सोनेवाने, ममता पटले(येडे), केंद्रप्रमुख निशा बोदेले, कुमुद शहारे, नर्सिंग इंचार्ज सुनिता खोब्रागडे उपस्थित होत्या.

यांनी केली मदत:  सृजन सामाजिक संस्थेचे  अध्यक्ष विजय ठवरे, उपाध्यक्ष वशिष्ठ खोब्रागडे व सचिव वरुण खंगार यांच्या भावनिक आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देवून खालील मान्यवर दान दात्यांनी भरपूर आर्थिक मदत केली. ज्यात प्रामुख्याने चंद्रपूर चे डायट प्राचार्य तथा शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, डायट गोंदियाचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, नर्सिंग ऑफिसर दिपलता तुरकर, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे , गोंदियाचे शिक्षणाधिकारी(प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये, गटशिक्षणाधिकारी विशाल डोंगरे, महेंद्र मोटघरे, साधनव्यक्ती  कुमुदिनी घोडेस्वार, हिमकांता कटरे, सेवानिवृत्त शिक्षक एल. यु. खोब्रागडे, केंद्रप्रमुख निशा बोदेले, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कुमुद शहारे, दिलीपसिंग परमार, आरोग्य भारती गोंदियाचे डॉ. प्रशांत कटरे, विशेष शिक्षिका दीपा बिसेन, शिक्षिका ममता पटले/येडे, योगिता संजय वानखेडे/ ढोरे, आदिवासी विकास विभाग संशोधन अधिकारी किशोर देशकर, LIC अभिकर्ता जोगेंद्र देशमुख, मुख्याध्यापक ए. टी. डुंबरे, शिक्षक संतोष कुंभारे, साधनव्यक्ती अनिता ठेंगडी, सुनील ठाकूर, ब्रजेश मिश्रा, रामू शेंदरे, उमेश भरणे, विजय कुमार लोथे, संजय मस्के, शिक्षक नरेंद्र गौतम, विनोद लिचडे, कु. प्रिया तिडके, गंगाधर चंद्रिकापुरे, दीपक रेवतकर, मंगेश रहमतकर, शालीकराम लीचडे, रोशन भैसारे, राहुल बिसने यांनी सहकार्य केले.

सर्व दान दात्यांचे सृजन सामाजिक संस्थेचे  अध्यक्ष विजय ठवरे, उपाध्यक्ष वशिष्ठ खोब्रागडे व सचिव वरुण खंगार यांनी शतशः आभार व्यक्त केले आहे.