आ.कोरोटेच्या प्रयत्नांमुळे ‘त्या’ ४० लोकांची दिवाळी झाली प्रकाशमय…

0
18

रुग्ण सहायता कक्षाच्या पुढाकाराने नागपूर येथे झाल्या शस्त्रक्रिया.

देवरी,दि.१६- वार्धक्याकडे झुकलेल्या आणि हलाखीचे जीवन जगत असलेल्या ‘त्या’ ४० लोकांचे जीवन जवळपास अंधारलेले होते. नेमकी हीच बाब आमगाव देवरी मतदार संघाचे आमदार सहसराम कोरोटे यांनी हेरली. जीवन अंधकारमय झालेल्या लोकांच्या मदतीला आमदार महोदय धावून गेले आणि रुग्ण सहायता कक्षाच्या मदतीने नागपुरात त्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करवून घेतली. परिणामी, त्या ४० लोकांच्या जीवनात ही दिवाळी प्रकाशमय झाली, अशी भावना जनमानसात उमटली आहे.

सोयीसुविधा आणि गरीबीमुळे आमगाव देवरी मतदार संघात अनेक रुग्ण हे आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. अशा नागरिकांच्या मदतीसाठी आमदार कोरोटे यांनी पुढाकार घेतला असून मतदार संघात जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय आरोग्य शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

आतापर्यंत जवळपास चार मोठे आरोग्य शिबिर आ. सहसराम कोरोटे यांच्या पुढाकाराने घेण्यात आले आहेत. काळीमाटी, सीतेपार, पालांदूर जमीनदारी आणि ककोडी या चार गावात हे शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून बऱ्याचशा रुग्णांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया, स्पाईनच्या शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया अशा खर्चिक शस्त्रक्रिया आ. कोरोटे यांच्या माध्यमातून मोफत करण्यात आल्या.

नेत्र शिबिरांच्या माध्यमातून प्रत्येक शिबिरात रुग्णांना मोफत चष्मेवाटप करून सोबतच त्या रुग्णावर नागपूर येथील नामांकित रुग्णालयात डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्याचं काम आ.कोरोटे आणि त्यांची चमू करीत आहे. नुकत्याच ककोडी येथे झालेल्या शिबिरातील ४० रुग्णांना दिवाळीपूर्वी नागपूर येथे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून या रुग्णांना त्यांच्या गावी सोडण्यात आले. ऐन दिवाळी पूर्वी शस्त्रक्रिया पूर्ण केल्याने आमची ही दिवाळी प्रकाशमान झाली, आम्ही दिवाळीचे दिवे पाहू शकलो, अशी कृतज्ञता त्या ४० लोकांनी व्यक्त करीत आ. कोरोटेचे मनापासून आभार मानले.

हा जनसेवेचा वारसा असाच पुढेही सुरू ठेवणार असून नागरिकांनी आरोग्यासंबंधी कुठल्याही समस्या असोत,त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत राहणार असल्याची ग्वाही आम. कोरोटे यांनी दिली आहे. यासाठी रुग्ण सेवा कक्षाचे प्रमुख देवेंद्र गणवीर ९४२०३६२६४३ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.