29 वर्षानंतर मुंडीपार येथील शाळेकरी मित्र आले एकत्र

0
12

गोरेगांव:-प्रत्येक जण आप-आपल्या कॅरिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो.मात्र जे विद्यार्थी शाळेत सोबत शिकले,घडले आणि वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोडले ती नाळ मात्र तशीच असते पण पुन्हा एकदा भेटावे, सर्वांशी हितगुज करावे असे सर्वांनाच वाटते पण प्रत्येक जण आप-आपल्या नोकरी धंद्यात, संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही मात्र ते अशक्यही नसते ज्या शाळेत आपण घडलो,आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र मिळाले आणी पुन्हा एकदा तेच मित्र 29 वर्षानंतर एक डाव पुन्हा मांडण्याची, भेटण्याची संधी चालून आली ती म्हणजे या दिवाळीच्या पावन पर्वावर स्नेह मिलन सोहळ्यामुळे.
शाळेतील मित्रमंडळी यांचा व्हाट्सअप ग्रुपमधून एकमेकांशी संपर्क येत होता पण अशातच सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली त्याला सर्व मित्र मंडळींनी सकारात्मक प्रतिसाद देत चुलबंद येथे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या परिसरात योजना आखून स्नेह मिलन सोहळा आयोजित केला.
हळूहळू सर्व मित्रपरिवार नियोजित जागेवर एकत्र गोळा झाल्यानंतर प्रत्येकाने आपली ओळख करून दिली. 10 हून अधिक माजी वर्गमित्र परिवारासोबत यावेळी एकत्र येऊन नव्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. सर्वांनी एकमेकांशी मनमुराद गप्पा करून नव्या जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या परिवाराविषयी, कामकाजाविषयी व सध्या आपल्या आयुष्यात काय चालत आहे हे एकमेकांना सांगतांना गप्पा रंगत गेल्या.
तसेच दिवंगत झालेले सोबत शिकणारे जिवलग मित्रांना श्रद्धांजलि अर्पण करण्यात आली.वर्गमित्र उमेंद्र ठाकुर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की आज आमच्या मित्र मंडळींना बघितले तर 29 वर्षानंतर ते चेहरे दिसले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या आयुष्यातले सर्व क्षण आठवणीत राहतात असे नाही पण काही क्षण असे असतात की जे विसरू म्हणताही विसरता येत नाही आपण वयाने कितीही मोठे झालो किंवा आपआपल्या क्षेत्रात कितीही मोठे झालो किंवा कितीही यशस्वी झालो तरी शाळेचे ते सोनेरी दिवस आपण कधीच विसरू शकत नाही पण वेळ कुणासाठी थांबत नाही आणि मागे पडलेले दिवस पुन्हा येत नाही पण ह्या सर्व आठवणी अमर असतात इतक्या वर्षानंतरही पहिल्या पावसाच्या मातीचा सुगंध शाळेची आठवण करून व्याकूळ करून सोडतो. मैत्री ही अवघड उन्हाळ परिपक्व तरीही सतत हवीहवीशी वाटणारी असते शाळा,विश्व आणि मित्रपरिवार हे एकमेकांशिवाय अधुरी आहेत. आजच्या या स्नेह मिलन सोहळ्यात या सर्व मित्र मंडळी सोबत जगलेले सोबतचे हे दिवस अजूनही प्रत्येकांना वाटत असेल की ही भेट फारच छोटी होती. सोशल मीडियावर अनेक जण मित्र होतात पण हे सर्व ऑनलाईन पुरताच मर्यादित आहे सोशल मीडियावर जवळ न येता सहवासात जवळ आला तर आयुष्याचे एक सोनेरी पान उघडल्यासारखा अनुभव येतो यासाठी एकमेकांना भेटणे गरजेचे असते. सोशल मीडियामुळे जग जवळ आलंय हे मात्र खरं पण आपणही त्याचप्रमाणे कधीतरी ऑफलाइन राहून आपल्या प्रिय माणसांना मनापासून भेटू या एकमेकांचे हितगुज समोर बसून शेअर करूया आणि प्रत्येक क्षणाच्या गोड आठवणी मनात जपूया.
ऑफलाइन जग खरा आनंद देऊन जाते, सुखद क्षण देऊन जाते हे या चुलबंद परिसरातील या स्नेहभोज मिलन सोहळ्यात 29 वर्षाचे शाळेकरी मित्र उमेंद्र ठाकुर, रूपचंद चौधरी,बाबुलाल ठाकुर, मनोज पवार,सुखचंद राऊत, गणेश भिमटे, अजय ताजने,विनय धामगाये,तेजराम नंदेश्वर,पृथ्वी धमगाये,ओमप्रकाश राहांगडाले सहित मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.