देसाईगंजच्या एका कथित नेत्याकडून राष्ट्रीय मानचिन्हाचा गैरवापर

0
9

राष्ट्रीय प्रतिक अधिनियम २००५ व आयटी ॲक्ट अन्वये कारवाईची मागणी

गडचिरोली दि. २६ –भारताचे राष्ट्रीय प्रतिक अधिनियम २००५ नुसार राष्ट्रीय चिन्हाचा खाजगी वापर करण्यास प्रतिबंध आहे. असे आढळल्यास संबंधितांवर दंड व शिक्षेचीही तरतुद आहे. भारताचे गौरव चिन्हांपैकी एक असलेल्या अशोकस्तंभ या चिन्हाचा सर्रास गैरवापर देसाईगंज येथील एका कथित नेत्याने मंत्री व अधिकारी यांना पत्र देत असल्याची गंभीर तेवढीच धक्कादायक माहिती समोर आली असून जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
भारताचे राष्ट्रीय प्रतिक अधिनियम २००५ मधील शेड्युल १ नुसार राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,पंतप्रधान, केंद्रीयमंत्री, राज्यपाल, लेफ्टनंट जनरल, केंद्र शासित प्रशासक, शासकीय अधिकारी, कार्यालय, न्यायाधीश, न्यायालयीन अधिकारी, योजना कमिशनचे अधिकारी, कार्यालये, मुख्य निवडणूक आयुक्त, हे राष्ट्रीय चिन्ह वापरू शकतात.राष्ट्रीय चिन्ह वापरण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना आहेत राष्ट्रीय चिन्ह कोणी वापरावे या बाबतीत स्पष्टपणे नमूद केले आहे त्याचा गैरवापर कोणीही करू शकत नाही राष्ट्रीय चिन्हांचा कोणीही नियमबाह्य वापर करून उल्लंघन केल्यास दोन वर्षाची शिक्षा आणि ५००० रुपये किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
त्यामुळे देसाईगंज येथील एका कथित नेत्याने राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोकस्तंभ या चिन्हाचा सर्रास गैरवापर करून अवमान केला असुन गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज (वडसा) येथील वळुमाता पशुप्रजनन क्षेत्रातील २३३.५७ हे आर ही जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २४ नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले असताना देसाईगंज येथील एका विशिष्ट सामाजिक संघटनेचा कार्याध्यक्ष असलेल्या लेटरपॅडवर भारताचे राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोकस्तंभ या चिन्हाचा सर्रास गैरवापर वापर करून उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र देऊन अवमानना करित समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्याने या कथीत नेत्यावर भारताचे राष्ट्रीय प्रतिक अधिनियम २००५ व माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.